देखण्या घराच्या युक्त्या
By Admin | Updated: April 4, 2017 18:39 IST2017-04-04T18:39:14+5:302017-04-04T18:39:14+5:30
घर सजवायला सर्वांनाच आवडतं. परंतु, इंटिरियर डेकोरेटर हे शब्द उच्चारले की डोळ्यासमोर अव्वाच्या सव्वा बजेट येतं. शाहरु खची पत्नी गौरी खान किंवा सुझान खाननं अलीकडेच आलिया भट, करण जोहर

देखण्या घराच्या युक्त्या
- सारिका पूरकर - गुजराथी
फक्त इंटेरियर डेकोरेटरच आपलं घर सजवू शकतात असं नाही. आपणही आपल्या आयडियांच्या कल्पनांनी आपलं घर देखणं करू शकतो.
घर सजवायला सर्वांनाच आवडतं. परंतु, इंटिरियर डेकोरेटर हे शब्द उच्चारले की डोळ्यासमोर अव्वाच्या सव्वा बजेट येतं. शाहरु खची पत्नी गौरी खान किंवा सुझान खाननं अलीकडेच आलिया भट, करण जोहर यांचे आलिशान फ्लॅट्स त्यांच्या अयडियाच्या कल्पनांनी एकदम पॉश करु न टाकले आहेत, हे तुमच्या एव्हाना वाचण्यात आलंच असेल. पण हे असंच काही नाहीये. म्हणजे सुझान, गौरीसारखा महागडा इंटिरियर डेकोरेटर नसला तरी तुम्हीच तुमच्या घराचे ‘इंटिरियर डेकोरेटर’ होऊ शकता आणि आपलं घर आपल्या कल्पनांनी सुरेख सजवू शकता. नुसत्या पाच सहा कल्पना वापरूनही आपण आपलं घर सजवू शकतो. खरंतर प्रत्येकाकडेच खूप काही कल्पना असतात. एकदा का त्यांनी त्या आपल्या घरासाठी वापरल्या तर आपलं घर उठून दिसलं नाही तरचं नवल!
1) कोणत्याही घराला फ्रेश लूक देण्यासाठी ‘एअरी, ब्राईट आणि लाईट’ या त्रिसूत्रीचा वापर करावा. म्हणजेच घरात छान हवा खेळली पाहिजे, भरपूर उजेड हवा आणि छान प्रसन्न, आल्हाददायक फील हवा. त्यासाठीच घरातील काही वस्तू, काही भिंती या फक्त प्युअर व्हाईट रंगात रंगवून घ्या. उदाहरणार्थ, एखादा सेंटर टेबलचा बॉटम, लाकडी खुचर््या या प्युअर व्हाईट रंगात रंगवा. घराला खूप फ्रेश लूक मिळेल.
2) डिनर प्लेट्सदेखील तुमच्या घराची भिंत सजवू शकतात. वेगवेगळ्या आकारातील, प्रकारातील डिनर प्लेट्स (सिरॅमिक किंवा फायबरच्या वापरु शकता)भिंतीवर चिकटवून एक छान आर्टपीस सहज तयार होतो.
3) तुमच्या घरातील इतर खोल्यांमधून दिवाणखान्याकडे जाणाऱ्या मधल्या भागात छान रनर घाला, गालिचे घाला. यामुळे एक शाही आणि डिसेंट लूक मिळेल. गालिचे फक्त दिवाणखान्यातच अंथरायचे असतात असं नाही, ते या पद्धतीनेही वापरता येतील.
4) बेडरु मच्या सजावटीसाठी मिक्स अॅण्ड मॅच पॅटर्नचा वापर करा. पिलो, बेडशीट आणि लॅम्पशेड यांच्या डिझाईन्स मिक्स अॅण्ड मॅच निवडा. थोडा नॉटी आणि रिलॅक्स फील येईल.
5) सेंटर टेबल, कॉफी टेबल यावर टेबल क्लॉथ, टेबल मॅट टाकत असाल तर तेच ते पाना-फुलांचं, फळांचं डिझाईन टाळून पॅटर्न्ड टेबलक्लॉथ अंथरा. टेबलाची आणि घराचीही शान नक्कीच वाढेल.
6) बाथरुममध्ये फ्लोअरवर (भिंतींवर नव्हे) नेहमीच क्र ीम, पांढऱ्या रंगाच्या टाइल्स लावल्या जातात, परंतु त्याऐवजी आकाशी रंगाच्या टाईल्स लावून बघा, बाथरु म टवटवीत दिसायला लागेल. त्याचप्रमाणे एखादा अॅण्टिक (लाकडी ) टेबल कोपऱ्यात मांडा ( अर्थात बाथरु म मोठं असेल तर) यामुळेही मॉडर्न आणि ट्रॅडिशनल लूूक मिळतो.