आॅफिसला जाताना सिम्पल, सोबर आणि सुंदर दिसायचंय मग कार्पोरेट कुर्तीज घाला!
By Admin | Updated: June 27, 2017 18:52 IST2017-06-27T18:52:54+5:302017-06-27T18:52:54+5:30
फॅशनच्या जगात कॉर्पोरेट वेअर, कॉर्पोरेट कुर्तीज असं एक नवं सेगमेंट नव्यानं आपली जागा निर्माण करत आहे.

आॅफिसला जाताना सिम्पल, सोबर आणि सुंदर दिसायचंय मग कार्पोरेट कुर्तीज घाला!
- मोहिनी घारपुरे - देशमुख
हल्ली सगळीकडेच कॉर्पोरेट कल्चरची चलतीआणि आहे. जात, धर्म यांपलिकडे जाऊन ग्लोबल मार्केटमध्ये कॉम्पिटिटीव्ह राहण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या बाबीवर हे कल्चर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. बुद्धीमत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास हे या कॉर्पोरेट कल्चरचं बेसिक सूत्र आहे. त्यामुळेच एकंदरीतच कॉर्पोरेटचा भाग असणाऱ्या मुलामुलींनी आपल्या पेहेरावावर विशेष लक्ष द्यावं असं फॅशन जग सांगतं. आणि म्हणूनच फॅशनच्या या जगात कॉर्पोरेट वेअर, कॉर्पोरेट कुर्तीज असं एक नवं सेगमेंट नव्यानं आपली जागा निर्माण करत आहे.
एवढं लक्षात ठेवाच!
*आॅफीसमध्ये अन्य सहकाऱ्यांचं लक्ष विचलित होईल असे कोणतेही कपडे घालूच नका. तसंच बांगड्या, मोठे मोठे कानातले, घुंगरू लावलेल्या ओढण्या किंवा कानातले वगैरे तर अजिबातच नकोत. त्यामुळे कामात लक्ष लागत नाहीच तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बुद्धीपेक्षा सौंदर्यालाच अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही
* आॅफिसमध्ये जाताना खूप आवाज करणाऱ्या चपला, बूट, सॅण्डल्स घालणंही टाळा.
*फार डीप नेक, स्लीव्हलेस कपडे वगैरे घालणं शक्यतो टाळा, त्याऐवजी स्टॅण्ड कॉलर, हाय नेक किंवा सिंपल सोबर कपडे घाला.