मोहिनी घारपुरे-देशमुख
लहान मुलींपासून ते तरूणींपर्यंत सगळ्यांच्याच वॉर्डरोबमधला अगदी आवडीचा ड्रेस म्हणजे स्कर्टमीडी. खरंतर या स्कर्टचे इतके प्रकार आहेत की विचारू नका. सुंदर, आकर्षक आणि अत्यंत कम्फर्टेबल असे स्कर्ट बहुतांश प्रत्येकीलाच मनापासून आवडतात. स्कर्टनं एक स्मार्ट लूकदेखील कॅरी करता येतो. मध्यंतरीच्या काळात लाँग स्कर्ट अर्थात पायघोळ स्कर्टची खूपच फॅशन आली होती. जागोजागी भरवल्या गेलेल्या हँडलूमच्या प्रदर्शनांमध्ये एक अख्खा काऊंटर अशा क्रेपच्या, फ्लोरल प्रिंटच्या आणि काहीशा डार्क रंगसंगतीच्या स्कर्टचाच असे. तेथे तरूणींची मोठ्या प्रमाणावर गर्दीही दिसे. मात्र क्रेप चे स्कर्ट हे वाऱ्यावर सहज उडणारे असल्याने या फॅब्रिकचे मीनी स्कर्ट मात्र अव्हेलेबल असणं अशक्यच. त्यामुळे ज्यांना स्कर्ट घालायची हौस पण मिनी किंवा नी लेंग्थ पर्यंतचा स्कर्ट ज्यांना अजिबात आवडत नाही अशा सगळ्याजणी या लाँग स्कर्टच्या चाहत्या झाल्या होत्या. अलिकडे मात्र हे लाँग स्कर्ट मागे पडले असून एका विशिष्ट कापडापासून बनलेले चेक्सचे स्कर्ट किंवा रफल्स लावलेले अत्यंत आकर्षक असे नी लेंग्थ पर्यंतचे किंवा मिनी स्कर्ट अधिक पसंतीस पडू लागले आहेत. पाश्चिमात्य स्त्रिया, तरूणींनी तर केव्हाच या प्रकारच्या स्कर्टला पसंती दिली आहे. भारतातही हळूहळू हा ट्रेण्ड येण्यास सुरूवात झाली आहे.
‘गिंगहॅम फॅब्रिक’
कॉटन कपड्यातलाच हा एक प्रकार. गिंगहॅम फॅब्रिक जनरली स्ट्रीप्ड किंवा चेक्सच्या प्रिंटचं असतं. त्याचा बेस कलर पांढरा असतो.
गिंगहॅम फ्रिल्ड, क्लिओ स्कर्ट
क्लिओ स्कर्टच्या रेंजमध्ये तुम्हाला या कापडापासून बनवलेले साधे सिंपल सोबर आणि विशेषत: खिसा असलेले स्कर्ट मिळतील. तर फ्रिल्ड स्कर्टमध्ये या कापडापासून बनवलेल्या स्कर्टला अत्यंत सुंदररित्या फ्रिलवर्क केलेले आढळेल. या दोन्हीहीपैकी तुमच्या चॉईसनुसार स्कर्ट सिलेक्ट करा आणि कॅज्युअल लुकसाठी तो वापरा. जितका स्मार्ट पद्धतीनं हा स्कर्ट घालाल तितकाच तुमचा लूक कूल वाटेल.