फेकलेल्या केसांतून मिळवा पुण्य : तुमची ‘हेअरस्टाईल’ बदलू शकते अनेकांचं आयुष्य

By admin | Published: May 15, 2017 04:41 PM2017-05-15T16:41:43+5:302017-05-15T16:41:43+5:30

केसांच्या विगमुळे ‘त्यांना’ मिळेल नवं आयष्य, जुळतील दुरावणारी नाती आणि चिमुरड्यांच्या चेहर्‍यावरही उमलेलं हास्य

Get Than Poor Hair Pure: Your 'hairstyle' can change many lives | फेकलेल्या केसांतून मिळवा पुण्य : तुमची ‘हेअरस्टाईल’ बदलू शकते अनेकांचं आयुष्य

फेकलेल्या केसांतून मिळवा पुण्य : तुमची ‘हेअरस्टाईल’ बदलू शकते अनेकांचं आयुष्य

Next

 - मयूर पठाडे

 
एखाद्या सलूनमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये हेअर कट करायला तुम्ही जाता, तेव्हा काय करता? आपल्याला आवडणार्‍या पार्लरमध्ये आपण जातो आणि सरळ आपल्याला आवडेल तशी हेअरस्टाईल करतो. पण हे करत असताना आपल्या त्या कापलेल्या केसांचं आपण काय करतो?
- खरं तर काहीच नाही. त्या फेकलेल्या केसांचं आपल्याला काही अप्रूपच नसतं. कारण आपल्याला माहीत असतं, महिना-दोन महिन्यात हे वाढलेले केस कापण्यासाठी, नवी हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला पुन्हा इथे यायचंच आहे.
पण कल्पना करा, ज्यांच्या डोक्यावर केसच नाहीत किंवा कॅन्सरसारख्या आजारामुळे, ब्रेन सर्जरीमुळे किंवा ज्यांच्या डोक्यावर आता परत कधीच केस उगवणार नाहीत, त्यांना या केसांच महत्त्व किती असेल?
 
 
कॅन्सरसारख्या आजाराशी झगडताना रुग्णांना त्यांच्या डोक्यावरचे केसही गमवावे लागतात. त्याचं त्यांना अपार दु:ख होतं, पण त्याहीपेक्षा ज्या रुग्णांना लहान मुलं आहेत, त्यांच्यासमोर आपण अशा अवस्थेत जाऊ नये, मुलांना त्यामुळे मोठा धक्का बसेल आणि आपल्यापेक्षाही हा धक्का पचवणं मुलांना जड जाईल, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे अनेक रुग्ण आपल्याला जीवापेक्षाही प्रिय असणार्‍या आपल्या मुलांपुढे या अवस्थेत जाणं टाळतात. केसांच्या विगमुळे त्यांच्या मनावरचं हे प्रचंड मोठं दडपण त्यामुळे हलकं होतं.
 
कोणाशी संपर्क साधाल?
 
मदत चॅरिटेबल ट्रस्ट, हेअर एड, सारगाक्षेत्र कल्चरल अँण्ड चॅरिटेबल सेंटर, हेअर फॉर होप. यासारख्या अनेक स्वयंसेवी संस्था केसदान जनजागृतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन कार्य करतात. विशेषत: मोठय़ा शहरातं, महानगरात या संस्था विशेषत्वानं कार्यरत आहेत. रुग्ण आणि दाते यांच्यातल्या संपर्काचं आणि रुग्णांना केसांचे विग मोफत देण्याचं काम ते करतात. 

Web Title: Get Than Poor Hair Pure: Your 'hairstyle' can change many lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.