शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

​"जिओ"...डिजिटल क्रांतिचे जनक मुकेश अबानींचे "हे" किस्से, जे फक्त काही लोकांनाच माहित आहेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 14:28 IST

मुकेश अंबानी यांनी मुंबई का सोडली, त्यांचे कॉलेजचे मित्र कोण आहेत जे अजूनही त्यांच्या सोबत आहेत, त्यांची पत्नी कोण आहे, जिओचा चीफ आॅफ स्ट्रेटजी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी...

-Ravindra Moreमुकेश अंबानी भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबाबतीत खूप काही गोष्टींची चर्चा होत असते. मात्र त्यांचे असे काही किस्से आहेत जे अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाहीत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...* धीरूभाई अंबानी यांचा मुलगा मुकेश अंबानी आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. ते स्वत: असे म्हणत होते की, ते अशावेळी जन्माला आले, ज्यावेळी लोकांना घरात सर्वात मोठे होण्याचा वेगळा फायदा मिळत असे. त्यांच्यामते १९६० च्या दशकात मुकेश आणि त्यांचे भाऊ-बहिण दीप्ति, नीना आणि अनिल यांच्यावर त्यांच्या वडिलांना एवढे बंधने लादण्याची गरज भासली नाही. मात्र ते असेही म्हणतात की, आता परिस्थिती बदलली आहे.* परिवार आणि कामामध्ये सतत सामंजस्य बनवून ठेवणारे मुकेश लहानपणापासूनच शिक्षणामध्ये खूप हुशार होते. कायमच त्यांनी शिक्षणासाठी वेळ काढला. ते म्हणतात की, त्यांचे ध्येय कधी जास्त पैसे कमविण्याचे नव्हे तर आव्हानांचा स्वीकार करणे होय. मुकेश यांना शिकण्याची एवढी आवड आहे की ते कधी-कधी रात्री दोन वाजेपर्यंतदेखील अभ्यास करतात. विज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची विशेष आवड आहे. विज्ञानाची बरीच पुस्तके ते आॅनलाइन खरेदी करतात. चॅरिटीमध्येही बरेच पैसे देतात मुकेश. २०१६ मध्ये तर त्यांनी ३०३ करोड रुपये दान केले आहेत. * मुकेश आपले वडील धीरू भाई अंबानी यांना आपले आदर्श मानतात. जसे धीरूभाई आपल्या व्यस्त आयुष्यातून कायम आपल्या परिवारासाठी वेळ काढत होते तसेच मुकेशदेखील आपल्या परिवारासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. मुकेश अंबानी यांचा जन्म अदन, यमनमध्ये झाला होता. तेव्हा त्यांचे वडील यमनच्या एका फर्ममध्ये काम करीत होते. १९५८ मध्ये ते मुंबई आले होते.* लहानपणी धीरूभाई यांनी कित्येकजणांची इंटरव्युव घेतल्यानंतर आपल्या मुलांसाठी एक शिक्षक ठेवले होते. त्यांचे काम शाळेचे शिक्षण देणे नव्हे तर जनरल नॉलेज वाढवायचे होते. ते दोन तास येऊन त्यांना मूव्हीज, मॅगजीन, न्यूज पेपरमधून ज्ञान देणे तसेच फुटबॉल सारखे खेळ देखील खेळवत असे. मुकेश म्हणतात की, ते दरवर्षी १०-१५ दिवस एखाद्या गावात जाऊ न कॅम्पिंग करण्यासाठी जात असे.* मुकेश म्हणतात की, त्यांची केमिकल इंजिनियरिंग करण्याची इच्छा ‘दि ग्रॅज्युएट’ चित्रपट पाहिल्यानंतर जागृत झाली होती. जो चित्रपट त्याकाळी खूपच पॉप्युलर होता. या चित्रपटातही पॉलीमर्स आणि प्लास्टिकवर चर्चा झाली होती. रिलायन्समध्ये त्यांनी कॉलेज सुरु असतानाच काम करणे सुरु केले होते. दुपारचे अडीच वाजता कॉलेज संपताच ते आॅफीस पोहचत असे. त्यांचे आयआयटी मुंबईतच झाले होते. मात्र मुंबई सोडून त्यांनी टॉप केमिकल इंजिनियरिंग इंस्टिट्यूट ‘युडीसीटी’ जॉइन केले. केमिकल इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी कित्येक परीक्षा दिल्या. त्यातील काही परीक्षा फक्त त्यांनी स्वत:ची क्षमता तपासण्यासाठी दिल्या होत्या. आपल्या मित्रांसोबत त्यांनी पुन्हा हॉर्वर्ड, स्टॅनफोर्डसारख्या कित्येक बिजनेस स्कुल्समध्ये अप्लाय केले ज्यात त्यांचे दोन-तीन स्कुल्समध्ये नावदेखील आले होते मात्र त्यांनी स्टॅनफोर्ड जॉइन केले. * मुकेश म्हणतात की, स्टॅनफोर्डची फॅकल्टी उत्कृष्ट होती. नोबेल पुरस्कार विजेता बिल शार्प त्यांचे फायनॅन्शियल इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकविले. * ११ वर्षापासून त्यांचे मित्र आनंंद जैन रिलायन्सचा ‘सेझ’ सांभाळत आहेत. शिवाय मनोज यांनादेखील ते केमिकल इंजिनियरिंगच्या वेळी भेटले होते आणि त्यांची मैत्री आजदेखील कायम आहे. * गुजराती मुकेश अंबानी यांना जेवणामध्ये साउथ इंडियन फूड्स खूपच आवडतात. मुंबईच्या माटुंगा स्थित मैसूर कॅफेमधील इडली-सांभर त्यांचे फेव्हरेट आहे. आजदेखील ते तिथे जाऊन जेवण करणे पसंत करतात. * त्यांचा २५ वर्षाचा मुलगा आकाश जिओमध्ये चीफ आॅफ स्ट्रेटजी आहे. मुलगी ईशा येल यूनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झाली आहे. सोबतच जियो आणि रिलायन्स रीटेलच्या संचालक मंडळातही आहे. २२ वर्षीय अनंत ब्राउन यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. मुकेश यांचे लग्न नीता अंबानीशी १९८५ मध्ये झाले होते. त्या रिलायन्स फाउंडेशनच्या चेयरपर्सन आहेत. सोबतच त्या अंतरराष्ट्रीय ओलंपिक संघाच्या पहिल्या भारतीय महिला मेंबर आहेत.  * जिओ आपल्या देशात नवी डिजिटल क्रांती घेऊन आला आहे. मुकेश यांनी फक्त ६ महिन्यात टेलीकॉम बिजनेसच्या सुमारे १२ टक्के  भागावर आपले वर्चस्व स्थापन केले आहे. अशा क्रांतीची सुरुवात केली ज्याबाबत कोणी विचारही के ला नसेल आणि एवढे सामर्थ्य उभारण्याचे साहस फक्त मुकेश अंबानीच करु शकता.मुकेश अंबानींजवळ जगातील सर्वात जास्त क्षमता असणारी पेट्रोलियम रिफायनरी आहे. पॉलीएस्टर फायबरच्या बाबतीतदेखील मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये ते जगात सर्वात पुढे आहेत. * मुकेश अंबानी यांचे घर ‘एंटीलिया’ साउथ मुंबईच्या ‘पेडर रोड’जवळ आहे. हे घर ब्रिटेनच्या रानीचा सरकारी बंगला ‘बकिंघम पॅलस’नंतर जगातील दुसºया क्रमांकाचे सर्वात महागडे घर आहे. ही गगनचुंबी इमारत सुमारे ४ लाख वर्ग फुटामध्ये विस्तारित असून या इमारतीत २७ मजले आहेत. सुमारे ६०० लोकांचा स्टाफ याठिकाणी रात्रंदिवस कामात लागलेले असतो. या इमारतीच्या ६ मजल्यांमध्ये तर फक्त पार्किंग आणि गॅरेज आहे. ‘एंटीलिया’मध्ये ९ लिफ्ट, १ स्पा, १ मंदिर, १ बॉल रुम आहे. याशिवाय एक प्रायव्हेट चित्रपटगृह, एक योगा स्टुडिओ, एक आयस्क्रीम रुम, तसेच २ ते ३ स्विमिंग पूलदेखील आहेत.