फ्लोरल आयलायनर : डोळ्यांवर फुलांची नक्षी काढण्याचा क्रेझी ट्रेण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:07 IST2017-09-23T12:53:56+5:302017-09-23T13:07:01+5:30
आयलायनर काळं लावण्याचा जमाना गेला आता रंगीत फुलंच उमलताहेत डोळ्यांवर

फ्लोरल आयलायनर : डोळ्यांवर फुलांची नक्षी काढण्याचा क्रेझी ट्रेण्ड
इन्स्टाग्रामचं पब्लिक सध्या एका गोष्टीवर जाम फिदा झालंय. फूल पागल झालेत इन्स्टा युजर्स आणि क्रेझ आहे भलत्याच ड्रामॅटिक गोष्टीची. ड्रामॅटिक डोळ्याची खरंतर! आणि त्याचं नाव आहे फ्लोरल आयलायनर. म्हणजेच आयलायनर नेहमीचंच पण त्यानं डोळ्यांवर फुलंच काय पुष्पगुच्छ काढत सुटल्यात जगभरातल्या अनेक मुली. आणि अशा फ्लोरल मेकपचे डोळे सध्या व्हायरल तर होत आहेतच शिवाय त्यांची क्रेझ अशी या नवरात्रीतही अनेकजण हा नवीन ट्रेण्ड कॉपी करत आहेत.
ही त्याची एक झलक
डोळ्यांना आयलायनर लावण्यात काही मोठं खास नाही, पण पापण्यांवर थेटे कपाळार्पयत फुलं काढणं, रंगबिरंगी वेलबुट्टी, चमकदार मोठ्ठी पानं, लांबचलांब पानांचे वेल, त्यात चमकिले रंग. भडक कलर्स. अत्यंत भारी गुलदस्ताच दिसतो हा चेहर्यावर. आणि ते करायला हिंमत लागते, तीच हिंमत सध्या अनेकजणी दाखवत आहेत आणि आपण ती हिंमत दाखवली हे जगाला सांगायला थेट फोटो टाकत आहेत.
कसा दिसतो हा ट्रेण्ड,
पहा हे काही फोटो.
फ्लोरल, भडक, ड्रामॅटिक आयलायनर लावायचं तर लक्ष त्याकडेच हवं, त्यामुळे बाकी मेकअपला सुट्टी. साधी एक प्लेन लिपस्टिक लावायची. बाकी कानात-गळ्यात काही घालायचं नाही. सगळा फोकस या डोळ्यांवरच्या फुलांवर ठेवायचा.