Fashion : नवीन जीन्सवर ‘हे’ प्रयोग करुन दिसा अधिक स्टायलिश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:13 IST
नवीन जीन्स पॅन्टवर थोडे हटके प्रयोग केल्यास आपण अधिक स्टायलिश दिसू शकाल. जाणून घेऊया कोणते प्रयोेग करायचे.
Fashion : नवीन जीन्सवर ‘हे’ प्रयोग करुन दिसा अधिक स्टायलिश !
बऱ्याचदा उंची कमी असलेल्या मुलींनी नवीन जीन्स पॅन्ट लांब होते. अशावेळी त्या टेलरकडे जाऊन पॅन्टची साइज कमी करतात. मात्र पॅन्टची साइज कमी न करता थोडे हटके प्रयोग केल्यास आपण अधिक स्टायलिश दिसू शकाल. जाणून घेऊया नवीन पॅन्टवर कोणते प्रयोेग करायचे. * जीन्स वॉर्डरोबचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमच्याकडे जीन्सचे स्टायलिश व्हर्जन असणे आवश्यक आहे. जीन्सवर विविध प्रयोग करून तुम्ही तिला कसाही लूक देऊ शकता. आपल्या स्टाईल व कम्फर्टनुसार जीन्सला कट व फोल्ड करा. * जीन्स फार लांब असेल तर खालून कापून छोटा करा. यासाठी जीन्स एखाद्या सपाट जागी ठेवा. टेपने दोन्ही पायांचे माप घेऊन खडूने खूण करा. आता कात्रीने जास्तीचा भाग कापून घ्या. स्टाईलसाठी याची हेमलाईन थोडी वर-खाली ठेवा. खालून थोडे धागे लांबलेले असतील तरी चालेल. * तुमची जीन्स अधिकच लांब असेल तर टेलरकडे न जाता घरीच तुम्ही ती लहान करू शकता. जीन्सची एक्स्ट्रा लेंथ खालून फोल्ड करा. दोन सेकंदाच्या या कामामुळे तुमच्या जीन्सची लांबी कमी होईल व तुम्ही घातलेली जीन्स स्टायलिशही दिसेल. एक किंवा एकापेक्षा जास्त फोल्ड तुम्ही करू शकता. * आई लहानपणी आपल्या हाताने तुमचे कपडे शिवून द्यायची. आता हेच काम तुम्हाला करायचे आहे. लांब जीन्स छोटी करण्यासाठी तिला खालून शिवून घ्या. रफ लूक हवा असल्यास हाताने शिवा. अन्यथा शिलाई मशीनने शिवा. * जीन्सला एका सपाट जागेवर ठेवा. आता जीन्सच्या पायाकडच्या आतील बाजूस डबल साईडेड टेप लावून नंतर जीन्स बाहेर किंवा आतल्या बाजूस फोल्ड करा. यामुळे फोल्ड उकलणार नाही. टेप सुरक्षित पर्याय आहे. गरज नसल्यास तुम्ही टेप काढून घेऊ शकता.