फेसबुकमुळे वाढणार गुणांची टक्केवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 23:34 IST
सोशल नेटवर्किंग वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष वाढवून त्यांना शिकण्यास मदत करता येऊ शकते,
फेसबुकमुळे वाढणार गुणांची टक्केवारी
फेसबुकचा वापर केवळ टाईमपास म्हणून नाही तर शिक्षणात गुण वाढविण्यासाठीसुद्धा होऊ शकतो असे एका रिसर्चमध्ये आढळून आले. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष वाढवून त्यांना शिकण्यास मदत करता येऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे.याचा सर्वात जास्त फायदा ‘ओपन आॅनलाईन कोर्सेस’ चालविणाºया संस्थांना होऊ शकतो. अशा प्रकारचे कोर्स असणाऱ्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना शिक्षक व इतर विद्यार्थ्यांशी कनेक्ट होण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये संवाद प्रस्थापित होत नाही. पेन्सिलव्हेनिया स्टेट विद्यापीठाचा माजी विद्यार्थी सैजिंग झेंग सांगतो की, सोशल मीडिया ही कमी भरून काढू शकतो. आमच्या संशोधनात असे दिसून आले की, ओपन कोर्सचे विद्यार्थी फेसबुक ग्रुपवर अधिक सक्रिय असतात.म्हणून फेसबुकचा वापर करून विद्यार्थ्यांना कोर्समध्ये अधिक चांगल्या प्रकारे सहभागी करून घेता येऊ शकते.