'एंगर मॅनेजमेंट'मधील अभिनेता चार्ली शीन याची बारमधून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:30 IST
'एंगर मॅनेजमेंट'मधील अभिनेता चार्ली शीन याची बारमधील एका महिलेच्या मोबाईलचे नुकसान केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली
'एंगर मॅनेजमेंट'मधील अभिनेता चार्ली शीन याची बारमधून हकालपट्टी
' एंगर मॅनेजमेंट'मधील अभिनेता चार्ली शीन याची बारमधील एका महिलेच्या मोबाईलचे नुकसान केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली. शीन हा कॅलिफोर्निया येथील हेनसीज टैवेर्न येथील बारमधील गेला होता. तेथील एका महिलेने शीन याचा व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा शीनला प्रचंड राग आला. त्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळला. शीनचा हा अवतार बघून संगळेच आश्चर्यचकीत झाले. अखेर सुरक्षारक्षकांनी त्याला बारमधून बाहेर काढले.