शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बॉलिवूड कलाकार वापरतात इतकी महागडी घड्याळं, किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 15:16 IST

बॉलिवूड कलाकारांची लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपले आवडते कलाकार, कसे राहतात, कोणत्या ब्रॅन्डते कपडे परिधान करतात, किती किंमतीच्या कार, घड्याळ वापरतात याची उत्सुकता लागलेली असते.

बॉलिवूड कलाकारांची लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपले आवडते कलाकार, कसे राहतात, कोणत्या ब्रॅन्डते कपडे परिधान करतात, किती किंमतीच्या कार, घड्याळ वापरतात याची उत्सुकता लागलेली असते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांच्या घडाळ्याच्या किमती सांगणार आहोत. 

इमरान हाशमी

बॉलिवूडचा सिरीअल किसर अशी ओळख असलेला इमरान हाशमी याला घड्याळं फार आवडतात. अनेक महागड्या ब्रॅन्डच्या घड्याळी त्याच्याकडे आहेत. त्याचा फेव्हरेट ब्रॅन्ड AudemarsPiguet हा आहे. सध्या तो घालत असलेली घड्याळ ही २.१ कोटी रुपये किंमतीची आहे. या घडाळ्याचे केवळ ३२ मॉडल तयार करण्यात आले होते. भारतात ही घड्याळ केवळ इमरानकडे आहे. 

शाहरुख खान

शाहरुख खान हा अनेकवर्ष  TafHeur चा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होता. त्याला या कंपनीच्या घड्याळी फार आवडतात. तो Tag HeurCarrerra Caliber ची काळ्या पट्ट्यांची घड्याळ वापरतो. याची किंमत ३.१ लाख रुपये आहे. पण शाहरुखने. 'जब हॅरी मेट सेजल' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान  Rolex Cosmograph Daytona ही घड्याळ घातली होती. या घड्याळीची किंमत १२ लाख रुपये आहे. 

अमिताभ बच्चन

(Image Credit : Mid Day)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे Longines घड्याळं वापरतात. या घड्याळाची किंमत ३ लाख रुपये आहे. पण अमिताभ बच्चन जे मॉडल घालतात त्याची किंमत ५ लाख रुपये आहे. 

अभि‍षेक बच्‍चन

(Image Credit : YouTube)

ज्यूनिअर बच्चन हा सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे कुठेही एकच घड्याळ वापरताना दिसतो. नेहमी पार्टीजमध्ये तो Seamaster 300 omega master ही घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत ८ लाख रुपये आहे. 

सैफ अली खान

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याच्याकडे घड्याळ्यांचं खास कलेक्शन आहे. सैफला घड्याळ्यांची फार आवड आहे. इतकी की, तो दर तीन दिवसांनी घड्याळ बदलतो. सैफला Jaeger Le-CoultreReverso वापरणे अधिक पसंत आहे. याची किंमत ७.१ लाख रुपये आहे. 

हृतिक रोशन

हृतिक हा आपल्या स्टाइलबाबत कधीच अॅडजस्टमेंट करत नाही. घड्याळांच्या बाबतीतही मागे नाहीये. हृतिक हा इंटरनॅशनल लक्झरी ब्रॅन्ड 'Rado' चा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे. तो  Rado Hyper Chrome Chronograph  ही घड्याळ वापरतो. याची किंमत ३.२ लाख रुपये आहे. 

जॉन अब्राहम

जॉन हा महागड्या बाईक्ससोबतच महागड्या घड्याळांचाही शौकीन आहे. जॉनच्या कलेक्शनमध्ये रोलेक्स आणि राडोसहीत अनेक महागड्या घड्याळं आहेत. जॉन सूटसोबत Swiss Strap "Swiss Qualite" Brown ही घड्याळ वापरतो. याची किंमत पाच लाख रुपये आहे. 

रणबीर कपूर 

रणबीर कपूर हा Heaur ब्रॅन्डची  Tag Heaur Grand Prix घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत ४.२ लाख रुपये आहे. 

दीपिका पादुकोन

दीपिका पादुकोनचा फेव्हरेट ब्रॅन्ड Tissot हा आहे. तिच्याकडे या ब्रॅन्डची क्लासिक प्रिन्स डायमंड रोज गोल्ड वॉच आहे. याची किंमत ८ लाख रुपये आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंग यालाही महागड्या घड्याळांची आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागडी घड्याळं आहेत. त्यात आता रोहित शेट्टीने दिलेल्या Franck Muller Vanguard घड्याळाचा समावेश झाला. ही घड्याळ ६ लाख रुपयांची आहे.

टॅग्स :bollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीfashionफॅशन