पाकिस्तानातल्या एका इंजिनिअर मुलानं रोबेटिक वेट्रेस बनवली आणि आपल्या वडिलांच्याच पिझ्झा रेस्टॉरण्टमध्ये तिला नोकरीही दिली!
By Admin | Updated: July 12, 2017 17:41 IST2017-07-12T17:32:47+5:302017-07-12T17:41:05+5:30
पाकिस्तनातील मुलतान शहरातील एका पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये रोबोट वेट्रेस आहे तिला पाहण्यासाठी तीन सर्व्ह केलेला पिझ्झा खाण्यासाठी गर्दी लोटत

पाकिस्तानातल्या एका इंजिनिअर मुलानं रोबेटिक वेट्रेस बनवली आणि आपल्या वडिलांच्याच पिझ्झा रेस्टॉरण्टमध्ये तिला नोकरीही दिली!
- माधुरी पेठकर
एखाद्या पिझ्झा रेस्टॉरण्टमध्ये गर्दी का होते? असा प्रश्न विचारला तर लगेच उत्तर मिळेल. ‘सोपं आहे , तिथला पिझ्झा चवीला एकदम बेस्ट असेल म्हणून तिथे गर्दी असेल!’
पण हे उत्तर इतर कोणत्याही रेस्टॉरण्टसाठी असतं तर बरोबर ठरलं असतं. पण पाकिस्तानातील मुलतान शहरातील ‘पिझ्झा डॉट कॉम’ या रेस्टॉरण्टसाठी म्हणाल तर उत्तर चुकीचं आहे.
कारण इथे लोकं नुसते जेवणासाठी किंवा पिझ्झा खाण्यासाठीच येतात असं नाही तर या रेस्टॉरण्टमधील वेट्रेस बघण्यासाठी, त्यांनी सर्व्ह केलेला पिझ्झा खाण्यासाठी मुलतान शहरातूनच नाही तर आजूबाजूच्या शहरातूनही लोक आवर्जून येतात. तासनतास रेस्टॉरण्टच्या बाहेर रांगा लावून आपला नंबर येण्याची वाट पाहात राहतात.
आता या वेट्रेसमध्ये एवढं काय आहे? असं विचाराल तर या वेटे्रस मानवी नसून रोबोट आहेत. या रोबोट वेट्रेसपिझ्झाची आॅर्डर त्या त्या टेबलवर बिनचूकपणे पोहोचवतात आणि परत आपल्या जागेवर जावून उभ्या राहतात. म्हणून हा सगळा कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय.
ही रोबोट वेट्रेस पिझ्झा आॅर्डर त्या त्या टेबलवर सर्व्ह करू शकते. मात्र ती आॅर्डर घेवू शकत नाही. पुढे जावून तिच्यात ही सुधारणा करण्याची ओसामाची इच्छा आहे.
ओसामानं रोबोट वेट्रेसच का बनवली? हा प्रश्न जो तो विचारतो आहे पण यामागचं कारण तांत्रिक असल्याचं ओसामाचं म्हणणं आहे. रोबोटचं शरीर स्त्री शरीर ठेवल्यानं मशीनला वजन बॅलन्स करायला सोपं जातं. ओसामानं रोबोट वेट्रेस आहे हे दाखवण्यासाठी तिला पेहराव तसाच दिला असून तिच्या गळ्यात स्कार्फही घातला आहे.
सध्या तर लहान मुलंच नाही तर मोठी माणसंही ही रोबोट वेट्रेसत्यांच्या टेबलजवळ सर्व्हिंगसाठी आली की तिच्यासोबत सेल्फी काढून इतरांना फॉरवर्ड करण्याची हौस भागवता आहेत.