शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

प्रभावी व्यक्तिमत्त्व ही यशाची गुरुकिल्ली

By admin | Updated: June 23, 2016 13:38 IST

व्यक्तिमत्त्व हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असून त्यानुसार समाजात आपली स्वत्वाची ओळख निर्माण होत असते

- रवींद्र मोरे
व्यक्तिमत्त्व हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असून त्यानुसार समाजात आपली स्वत्वाची ओळख निर्माण होत असते. आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे कोणी यशस्वी नायक झाला आहे, तर कोणी राजकारणी, तर कोणी मोठा उद्योजक. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमके काय? ते कसे घडते? याबाबत सखोल माहिती या लेखात आपण जाणून घेऊ...
''व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून व्यक्तीची जी काही जडण-घडण होत असते ती म्हणजे व्यक्तिमत्त्व होय.'' 
 
व्यक्तिमत्त्वाचा विकास
जीवन जगत असताना विविध बाह्य घटकांचा, विशेषत: सामाजिक घटकांचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत असतो. शरीराचा रंग व ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येते. या गोष्टी तिला उपजत मिळालेल्या असतात. जैविक बीजे आणि बाह्य घटक यांच्यातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय. अर्थात व्यक्तिमत्त्व विकासात आनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हीशी संबंधीत घटकांचा वाटा असतो. 
 
बौद्धिक क्षमता 
बौद्धिक क्षमतेचा व्यक्तिविकासावर फार परिणाम होतो. ज्या गोष्टी तैल बुद्धीच्या व्यक्ती सहज करू शकतात त्या गोष्टी मंद बुद्धीच्या व्यक्तींना जमत नाही. एखाद्या व्यक्तीच्या बुद्धीची चमक दिसताच अन्य व्यक्ती प्रभावित होतात. बुद्धीसामथ्याने कोणतीही व्यक्ती इतरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकते.  
 
कुटुंबाची भूमिका 
घर हाच मुलांचा पहिला सामाजिक परिसर होय. आई वडील व कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या वर्तनाचा तसेच घरातील एकूण वातावरणाचा मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो. मुलांच्या योग्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याची मातृप्रेमाची गरज योग्य त्या प्रमाणात लहानपणी भागविली जाणे अत्यावश्यक असते. ज्या मुलाला प्रेमळ, वत्सल, सद्वर्तनी, फाजील लाड न करणारे व अपत्याच्या योग्य विकासाची काळजी घेणारे आई वडील लाभतात त्यांचे व्यक्तिमत्त्व योग्य रीतीने उमलते. घरात वडिलांचा आवश्यकतेपेक्षा जास्त दरारा असेल व मुलाला कोठलेही स्वातंत्र्य लाभत नसेल तर अशी मुले भित्री, कातर स्वभावाची होतात. मातापित्यांचा लहानपणीच वियोग झालेली मुले धास्तावलेली व चिंताग्रस्त होतात. ज्या मुलांचा फाजील लाड होतो ती मुले लहरी, स्वार्थी व हेकट स्वभावाची होतात. एकुलत्या एका मुलाला आपल्या बरोबरीच्या मुलांचा सहवास न लाभल्यामुळे अकाली प्रौढत्व येते. 
 
शेजार व मित्र 
घराबाहेर पडता येऊ लागल्यावर मुले शेजारच्या समवयस्क मुलांबरोबर खेळू लागतात. चांगल्या मित्रांच्या सहवासात असणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले पैलू पडत जातात, तर वाईट मुलांच्या संगतीत असणारे मुले दुर्वतनी होऊ लागते.
 
शाळा 
शाळा म्हणजे छोटेखानी समाज होय. वयाच्या सहाव्या वर्षी मूल प्राथमिक शाळेत जाऊ लागते. तत्पूर्वी काही मुले माँटेसरी, अंगणवाडी, बालवाडी यासारख्या शाळांमधून गेलेली असतात. घरच्या वातावरणापासून शाळेच्या वातारवणात आलेली मुले सुरुवातीला भांबावलेल्या स्थितीत असतात. अशावेळी त्यांच्या दृष्टीने प्रेमळ व कर्तव्यदक्ष शिक्षक आदर्श ठरतात. रागीट व लहरी शिक्षक त्यांना आवडत नाहीत. उत्तम शालेय वातावरण व आदर्श शिक्षक यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर निश्चितच चांगला परिणाम होतो.
 
व्यक्तिमत्त्वाची सुधारणा 
व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालील सूचना लक्षात ठेवणे व त्यावर अंमल करणे उपयुक्त ठरेल.
व्यायाम आणि नियमित सकस आहार घेऊन व्यक्तीला आपले शरीर निकोप व पिळदार बनविता येते. काळा रंग व बसके नाक असूनही व्यक्तीचे शरीर पिळदार तर या पिळदारापणाची इतरांवर छाप पडणारच.
एक नुर आदमी और दस नुर कपडा असे म्हटले जाते. आपण योग्य ते कपडे परीधान केले तर आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसते. शरीर स्वच्छ ठेवणे, योग्य केशरचना करणे, नीटनेटके कपडे वापरणे हे प्रत्येकाच्या स्वाधीनचे आहे. या गोष्टीमुळे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. नेहमी हसतमुख असणारी व गोड बोलणारी व्यक्ती कुणालाही आवडते. सदासर्वदा कपाळावर आठ्या असलेल्या, दुर्मुखलेल्या व्यक्तिचा सहवास आपल्याला आवडत नाही. आपली वृत्ती आनंदी ठेवणे व गोड बोलणे फारसे कठीण नाही..
आपण आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी अनेक थोर व्यक्तींचे जीवन चरित्र वाचत राहिले पाहिजे. थोर व्यक्तींनी आपले जीवन कसे घडविले त्यांनी कोणकोणते कार्य केले आहे. आपले स्वत:चे जीवनमान कसे उंचावले आहे यावरून आपण आपले सुद्धा व्यक्तिमत्त्व सुधारू शकतो. 
 
सेलिब्रिटींनी असे घडविले स्वत:ला
 
 
काही व्यक्तींना उंच धिप्पाड तर काहींना बुटके शरीर लाभलेले असते, काही व्यक्तींचे शरीर सुडौल आणि व्यंगरहीत असते तर काहींना शारीरिक व्यंगे असतात. उत्तम शरीरयष्टी व आकर्षक चेहरा असणाºया व्यक्तींचा चेहरा इतरांवर लवकर प्रभाव पाडतो. उत्तम शरीरसंपत्तीच्या बळावर व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. 
बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर लहानपणी खूप जाडे होते. मात्र नियमित व्यायामाने अर्जुनने स्वत:चे शरीर सुडौल बनवून यशस्वी नायकांच्या यादीत स्वत:चा समावेश करून घेतला. तर
भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत सध्या कौतुकाचा विषय बनले आहेत. सलमानपासून ते धोनीपर्यंत सर्वच जण त्याची प्रशंसा करत आहे. 
असं काय केलंय या पठ्ठ्याने? केवळ १८ महिन्यांत अनंत अंबानीने तब्बल १०८ किलो वजन कमी केले आहे. त्याने गेली दीड वर्षे कठोर मेहनत घेऊन १०८ किलो वजन कमी केले आणि   तेदेखील सर्जरी किंवा औषध-गोळ्यांनी नाही तर संपूर्णत: नैसर्गिक पद्धतीने.