किचन सुंदर करण्याच्या सोप्या युक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 18:08 IST2017-04-27T18:08:08+5:302017-04-27T18:08:08+5:30
किचनला केवळ स्वयंपाक करण्यापुरतीची जागा इतकीच मान्यता न देता या खोलीलाही घरातील अन्य खोल्यांप्रमाणे सजावटीसाठी प्राधान्य द्यायला हवं.

किचन सुंदर करण्याच्या सोप्या युक्त्या
- सारिका पूरकर-गुजराथी
किचन. गृहिणींची हक्काची जागा. दिवसातील सर्वात जास्त वेळ त्या येथेच घालवतात. किचनमधील प्रत्येक वस्तूशी त्यांची एक खास अटॅचमेंट असते. शिवाय नोकरदार महिलांनाही थोडा वेळ का होईना पण किचनमध्ये घालवावा लागतोच ! त्यामुळे या किचनला केवळ स्वयंपाक करण्यापुरतीची जागा इतकीच मान्यता न देता या खोलीलाही घरातील अन्य खोल्यांप्रमाणे सजावटीसाठी प्राधान्य द्यायला हवं.
तसं हल्ली मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, चिमणी याद्वारे तसा प्रयत्न होताना दिसतोय. पण हे झाली मोठ्या किचनची गोष्ट. ज्यांचं किचन लहान आहे, तेथे फ्रीज, टेबल, किचन ओटा यामुळे जास्त जागाच उरत नाही अशा किचनलाही ठरवलं तर छान सजवता येतं. काही साध्या-सोप्या ट्रिक्स वापरुनही किचनला फ्रेश ठेवता येतं. तुमच्याकडे ज्या वस्तू आणि जेवढी जागा उपलब्ध आहेत, त्या वापरुनच किचन सजवता येतं.