अॅँजेलिनाची डुप्लिकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:45 IST
जगात एका व्यक्तीसारख्या दिसणाºया सात व्यक्ती असतात असे म्हटले जाते. अँजेलिनाच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले आहे. व्हेरोनिका ब्लॅक दिसायला अगदी अँजेलिना जोलीसारखी आहे.
अॅँजेलिनाची डुप्लिकेट
जगात एका व्यक्तीसारख्या दिसणाºया सात व्यक्ती असतात असे म्हटले जाते. अँजेलिनाच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले आहे. व्हेरोनिका ब्लॅक दिसायला अगदी अँजेलिना जोलीसारखी आहे. तिच्या या लुकने तिला आॅनलाईन जगात अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचिवले आहे. अँजेलिना जोलीचे लिप्स असोत किंवा कमनिया बांधा, २७ वर्षीय व्हेरोनिका ब्लॅक अगदी हुबेहुब तिच्यासारखी दिसते. तिचा वागण्या-बोलण्याचा अंदाजही अँजेलिनासारखा आहे. पण तिचा हा लुक नैसर्गिक आहे असे नाही. त्यासाठी तिने सर्जरीची मदत घेतली आहे. इंजेक्शन देऊन अँजेलिनासारखे मादक लिप्स तिने घडविले आहेत. सर्जरी करु न ब्रेस्टचा आकार वाढवला आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.