ड्रेस गबाळा वाटतोय का? मग वरून श्रग घाला आणि स्मार्ट दिसा!
By Admin | Updated: May 10, 2017 17:10 IST2017-05-10T17:10:52+5:302017-05-10T17:10:52+5:30
कितीही गबाळा लूक कॅरी करत असलात तरीही एखादा स्मार्ट श्रग घातला की तुमचा लुक एकदम अपडेट होऊ शकतो.

ड्रेस गबाळा वाटतोय का? मग वरून श्रग घाला आणि स्मार्ट दिसा!
-मोहिनी घारपुरे-देशमुख
कितीही गबाळा लूक कॅरी करत असलात तरीही एखादा स्मार्ट श्रग घातला की तुमचा लुक एकदम अपडेट होऊ शकतो.
एखाद्या दिवशी वॉर्डरोबमधलं नेमकं काय घालावं हेच लक्षात येत नाही. कितीही चांगले कपडे जवळ असले तरीही कधी ते नीट धुतलेले नसतात किंवा त्यांना व्यवस्थित इस्त्री केलेली नसते. मग अशावेळी नेमकी तारांबळ उडते. अगदी अशाच वेळी मदतीला धावतो तो श्रग.