शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

घर सजवण्यासाठी महागडे शोपीस कशाला थोडी डोकॅलिटी लावून घरातल्याच वस्तूंनी घर सजवा!

By admin | Updated: May 6, 2017 17:51 IST

घरातील छोट्या-छोट्या वस्तूंना जर घरगुती वस्तूंनीच सजवलं तर खूप काही क्रिएटिव्ह करता येतं. आणि छोट्या गोष्टींमधील मोठ्या क्रिएटिव्हिटीचा आनंद घेता येतो.

सारिका पूरकर-गुजराथीघरातील छोट्या-छोट्या वस्तूंना जर घरगुती वस्तूंनीच सजवलं तर खूप काही क्रिएटिव्ह करता येतं. उगाचच किचकट कलाप्रकारांना हाताळण्यापेक्षा, महागडी शोपीस आणण्यापेक्ष या छोट्या गोष्टींमधील मोठ्या क्रिएटिव्हिटीचा आनंद घेता येतो.

 

घर सजवण्याचे सोपे प्रयोग१) जुन्या पद्धतीचा लाकडी स्टूल असेल तर तो घ्या. त्याला पांढऱ्या रंगात रंगवून घ्या. वाळला की उलटा ठेवा. आता पाय ठेवण्यासाठीची जागा वर येईल, त्या भागावर घरातील जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिवून त्या अडकवा. यात तुम्ही छोट्या-छोट्या वस्तू ठेवूू शकता.२) काचेचा आकर्षक जार घ्या. यात तुमच्या आवडीचा अ‍ॅक्रेलिक रंग ओतून घ्या. फार नको, दोन चमचे पुरेसा होईल. रंग ओतल्यावर जारभर तो रंग जार फिरवत फिरवत पसरवून घ्या. रंग वाळला की बघा किती छान इफेक्ट मिळेल. बाहेरुन तुम्ही आऊटलाईनरनं हवे ते डिझाईन काढून सजवू शकता. सुंदर फ्लॉवर वासे तयार.३) फुलं ठेवण्यासाठी जसा वासे असतो ना तसे लहान आकाराची फुलं, कळ्या ठेवण्यासाठीही छोटा वासे असतो. तो तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचे छोटे ग्लास, काचेचे छोटे ग्लास घ्या. आकर्षक रंगीत फुगे घेऊन त्याचा वरचा भाग , जेथून हवा भरतो तो थोडासा कापून टाका. आता फुगा ग्लासभोवती पूर्ण गुंडाळून घ्या. ग्लास रंगीत दिसेल, वरच्या भागावर थोडे होल करुन यात कळ्या, छोटी फुले अरेंज करा. असे चार-पाच रंगीत वासे एकत्र ठेवता येतील.४) घराच्या, गाडीच्या, कपाटाच्या, आॅफिस ड्रॉवर्सच्या चाव्या त्याच त्या रंगात पाहून बोअर झालात ना ! त्यांचा मेकओव्हर करुन टाका. बाजारात ग्लिटर्स मिळतात (पूड आणि लिक्विड स्वरुपात) पूड वापरत असाल तर चावीच्या वरच्या भागावर फेविकॉल लावून पूडमध्ये घोळवा. बस्स, लखलखीत चावी तयार. लिक्विड वापरत असाल तर ब्रशनं थेट चावीवर लावून वाळू द्या.५) लहान-मोठया आकारातील झाडाच्या वाळलेल्या फांद्या घ्या. कात्रीनं त्याचे छोटे तुकडे कापून घ्या. कुंड्यांवर, फ्लॉवरपॉट्सवर हे तुकडे चिकटवून हटके लूक मिळवा.

७) आकर्षक रंगातील पेपर कप घ्या (जे कप केकसाठी वापरतात, जरा जाडसर कागद हवा) त्यांच्या कडा कापून फुलाचा आकार द्या. प्लेन कप आणि फुलाचा आकार दिलेला कप लायटिंगच्या बारीक दिव्यांमध्ये अडकवा. फुलांची लायटिंग तयार होईल.८) वर्तमानपत्राचे दोन आडवे समान तुकडे करा. प्रत्येक तुकड्याच्या एका कोपऱ्यावर झाडूची काडी ठेवून गुंडाळी करुन घ्या. शेवटचे टोक चिकटवून काडी काढून घ्या. अशा पेपर स्ट्रॉ तयार करुन घ्या. आता एक स्ट्रॉ घेऊन ती हातानं दाबून चपटी करा आणि पेनाभोवती गुंडाळून घ्या. टोक चिकटवून घ्या. असेच भरपूर रोल बनवून घ्या. या रोलचा वापर करुन तुम्ही सुंदर बाऊल, टी-कोस्टर्स, वॉल हॅँगिंग, फोटो फ्रेम, डेकोरेटिव्ह मिरर, लॅम्पशेड बनवू शकता. अशा उपायांनी आपलं घर तर सुंदर दिसतंच शिवाय आपल्यातली ‘क्रिएटिव्हिटी’ही बाहेर येते.