घामट उन्हाळ्यात कूल शॉर्टस !
By Admin | Updated: April 26, 2017 18:01 IST2017-04-26T18:01:38+5:302017-04-26T18:01:38+5:30
कडाक्याच्या उन्हात पुरूषांना शॉर्टस- बर्मुडा जास्त कूल फील देवू शकतात. शॉर्ट्स कॅरी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. अन्यथा शॉर्ट्स घातलेले पुरूष अगदी काही सेकंदातच ओंगळवाणे दिसू लागतात.

घामट उन्हाळ्यात कूल शॉर्टस !
- मोहिनी घारपुरे-देशमुख
उन्हाच्या झळा जसजशा वाढताहेत तसतसे जाडेभरडे, घट्ट कपडे अगदी नकोसे वाटू लागले आहेत. हे असं स्त्रिया, पुरूष, मुलं-मुली असं सगळ्यांनाच वाटत अहे. याबाबतीत पुरूषांचा विचार केला तर कडाक्याच्या उन्हात पुरूषांना शॉर्टस- बर्मुडा जास्त कूल फील देवू शकतात. शॉर्ट्स कॅरी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. अन्यथा शॉर्ट्स घातलेले पुरूष अगदी काही सेकंदातच ओंगळवाणे दिसू लागतात. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी बर्मुडा किंवा शॉर्ट्स घालणार असाल तर ती नीट कॅरी करा.घरात किंवा बाहेर जुजबी कामासाठी जातानाही शॉर्ट्स घालू शकता. फक्त त्याच्याबरोबर त्याला साजेसा एकंदर पेहेराव असायला हवा.एखादा प्लेन कलरचा शर्ट, किंवा फंकी टी शर्ट आणि शूजपेक्षाही लोफर्स घातले तर शॉर्ट्समधला लूक छान दिसतो.