बॅँड सदस्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:25 IST
ऑस्ट्रेलियाच्या पॉप बॅँड '५ सेकंड्स ऑफ समर'च्या स...
बॅँड सदस्यांवर टीका
ऑस्ट्रेलियाच्या पॉप बॅँड '५ सेकंड्स ऑफ समर'च्या सदस्यांनी एका साप्ताहिकाच्या कव्हर पेजसाठी नग्न फोटोशूट केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ल्यूक हेमिंग्स, कॅलम हुड, एश्टन इर्विन व माईकल क्लिफॉर्ड यांनी 'रोलिंग स्टोन' या साप्ताहिकाच्या जानेवारीच्या अंकासाठी हे फोटोशूट केले आहे. मात्र यामुळे या सर्वच सदस्यांना बर्याच लोकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या फॅन्सनी या फोटोचा समाचार घेतला आहे.