क्रिसने महिलेच्या कानशिलात भडकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:20 IST
अमेरिकी गायक क्रिस ब्राउन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतो. यावेळेस तर त्याने चक्क एका महिलेच्या कानशिलात लागवल्याने पुन्हा एकदा तो वादाच्या भोवºयात सापडला आहे.
क्रिसने महिलेच्या कानशिलात भडकावली
अमेरिकी गायक क्रिस ब्राउन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतो. यावेळेस तर त्याने चक्क एका महिलेच्या कानशिलात लागवल्याने पुन्हा एकदा तो वादाच्या भोवºयात सापडला आहे. एका कार्यक्रमाप्रसंगी महिला फॅन्सने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र क्रिसला याचा प्रचंड राग आला. त्याने थेट त्या महिलेच्या कानशिलात भडकावली. हा सर्व प्रकार क्रिसच्या सिक्यूरिटी गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने महिलेचा सेल फोन हिसकावून घेतला. सार्वजनिक ठिकाणी हा सर्व प्रकार घडल्याने क्रिसवर चहुबाजुने टीका केली जात आहे.