मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात घटवले १८ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 19:42 IST
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तीन महिन्यांमध्ये १८ किलो वजन कमी केले.
मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात घटवले १८ किलो वजन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तीन महिन्यांमध्ये १८ किलो वजन कमी केले. होय, यामागची प्रेरणा म्हणाल, तर देवेन्द्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस. पत्नीकडून प्रेरणा घेत मुख्यमंत्र्यांनी मेटाबॉलिक ट्रिटमेंट सुरु केली. फेबु्रवारीत त्यांनी ही ट्रिटमेंट सुरु केली तेव्हा त्यांचे वजन होते १२२ किलो. आता ते घटून १०४ किलोंवर आले आहे. अमृता फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. मी वेट लॉस प्रोग्राम सुरु केला आणि माझे वजन ५ ते ६ किलो कमी झाले. माझे बघून देवेन्द्र यांनाही हुरूप आला आणि त्यांनीही वजन कमी करण्याचे मनावर घेतले, असे अमृता म्हणाल्या. अर्थात याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता पर्सनल बाब असल्याचे सांगून हा प्रश्न त्यांनी टाळला.