शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रेटींच्या बेबी बम्प फोटोशूट फॅशन मागे आहे एक सक्षम विचार. मातृत्त्वाचा आनंद वेगळ्यापध्दतीनं साजरा करण्यासाठी केलं जातं बेबी बम्प फोटोशूट.

By admin | Updated: July 5, 2017 19:39 IST

हल्ली सेलिब्रेटिंच्या जगात बेबी बम्प दाखवण्याची नवी फॅशन रूढ झाली आहे. सेरेनाचं बेबी बम्प फोटो शूट हे या फॅशनमधलं बोल्ड पाऊल.

-सारिका पूरकर-गुजराथीसेरेना विल्यम्स. स्टेफी ग्राफचा २२ ग्रॅण्डस्लॅमचा विक्रम मोडून टेनिस जगतात आपला दबदबा निर्माण करणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीची नंबर वन टेनिसपटू. तिला टेनिस सम्राज्ञी म्हणनंच जास्त संयुक्तिक. सेरेना ओळखली जाते ते तिच्या झंझावातामुळे . टेनिस कोर्टवरील झंझावातानं जगप्रसिध्द झालेली ही टेनिसपटू हल्ली तिच्या खाजगी आयुष्यातल्या एका घटनेने भलतीच चर्चेत आली आहे. सेरेनाची यामुळेही एक वेगळी ओळख जगाला झालीय. एक धडाकेबाज खेळाडूसोबतच स्वतंंत्र बाण्याची स्त्री म्हणून सेरेना सध्या चर्चेत आहे. दोन महिन्यांची गरोदर असतानाही आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळली. नुसतीच खेळली नाही तर जेतेपदही पटकावलं. साहजिकच गर्भारपणाचा बाऊ न करता ते सक्षमपणे पेलण्याचा, सांभाळण्याचा आणि यात कुठेही स्वत:चं अस्तित्त्व विसरु नका हा संदेशच तिनं दिला आहे. देऊ केला आहे.

 

आता यापुढे जाऊन तिनं नुकतंच एका मॅगझिनच्या कव्हरसाठी तिच्या बेबी बम्पसह न्यूड फोटोशूट केलंय . बेबी बम्प दाखवण्याचा एक नवा पायंडा सेरेनानं घालून दिला आहे. हल्ली सेलिब्रेटिंच्या जगात बेबी बम्प दाखवण्याची नवी फॅशन रूढ झाली आहे. सेरेनाचं बेबी बम्प फोटो शूट हे या फॅशनमधलं बोल्ड पाऊल. पूर्वी गर्भवती असल्याचं कळलं की आघाडीच्या अभिनेत्री, खेळाडू किंवा अन्य सेलिब्रिटी महिला कॅमेऱ्यासमोर येण्याचं धाडस करत नसत. का ? तर या काळात वजन वाढलेलं असतं. शरीर बेढब दिसतं. प्रेक्षक चाहत्यात स्लिम अ‍ॅण्ड ट्रिम अंदाजातल्या आपल्या इमेजला याअवस्थेतील बेढबपणामुळे धक्का लागू नये याची काळजी त्या आग्रहपूर्वक घ्यायच्या. आता मात्र जमाना सेलिब्रेटींच्या जगातला जमाना बदललाय. त्यांच्यातील आई होऊ पाहणारी स्त्री खऱ्या अर्थानं फुलू लागलीय. होय, कारण गर्भारपणाचा ‘मातृत्वाचा आनंद’ या पलीकडे जाऊन त्या विचार करु लागल्या आहेत. तो विचार हाच आहे की, ‘कोणत्याही वयात, कोणत्याही टप्प्यावर आपले शरीर जसं असतं तसे ते स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा, त्याचा आदर करा.’

 

सेरेना विल्यम्सच नाही तर आपल्याकडे सेलिना जेटली हिनंही बिकिनी घालून नुकतंच असं फोटोशूट केलंय. सेलिना पुन्हा जुळ्यांना जन्म देणार आहे. यापूर्वी कोंकणा सेन, श्वेता साळवे, तारा शर्मा, लिसा हेडन, मंदिरा बेदी यांनी खास बेबी बम्पचं फोटोशूट करुन सोशल मीडियावर ते शेअर केलेय. जेनेलिया डिसुझा, अर्पिता शर्मा,सोहा अली खान, मीरा राजपूत यांनीही बेबी बम्पसह फोटोशूट केले. करिना कपूरनं तर गर्भारपणाची व्याख्याच बदलून टाकली. ‘मी गर्भवती आहे, आजारी नाही’ असं म्हणून तिनं संपूर्ण नऊ महिने कोठेही गर्भारपण न लपवता काम केलं. गर्भावस्थेतली फॅशन एस्टाबलिश करणारे फॅशन शोजचं तिनं प्रतिनिधित्व केलं.एकेकाळी सेलिब्रिटींचं  गर्भारपण ही अत्यंत गोपनीय बाब होती. माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांना कधी पाहिलत का आपण गर्भारपणात ? नाही ना? कारण त्या काळातील सेलिब्रेटींचं गर्भारपण ही बाब खासगीपेक्षा त्याच्या सौंदर्याला बाधा आणू पाहणारी म्हणून बघितली जात होती. आज मात्र चित्र एकदम बदललं आहे. या सुखद क्षणांचा अभिमान म्हणून सर्वच सेलिब्रेटी आता गर्भारपणही सोशल करु लागल्या आहेत.

 

भारतात बेबी बम्प फोटोशूट आत्ताआत्ता सेलिब्रेटी धाडसानं करताना दिसताहेत. अमेरिकन अभिनेत्री डेमी मूर हिनं मात्र १९९१ मध्येच बेबी बम्पसह न्यूड फोटोशूट करुन एक नवा विचार रूजवू पाहिला होता. त्यानंतर ब्रिटनी स्पिअर ( २००६), मिरांडा केर (२०१० ), जेसिका सिम्पसन ( २०११ ) यांनीही असे फोटोशूट करुन डेमीला पाठिंबा दिला होता. आता सेरेनानं असं फोटोशूट केल्यानंतर साहजिकच या फोटोशूटला अधिक ग्लॅमर आणि महत्व प्राप्त झालंय. कारण या अभिनेत्रींपेक्षा सेरेना टेनिसच्या माध्यमातून जगभरात पोहोचली आहे. साहजिकच तिच्या या फोटोशूटनं सर्वच महिला सेलिब्रेटी, प्रसारमाध्यमं, व्यावसायिक छायाचित्रकारांना गर्भवती महिलांचं सौंदर्य नव्यानं समजून घेण्यात मदतच होणार आहे. गर्भवती असताना बाळाच्या वाढीनुसार वाढणारा पोटाचा आकार आता चिंतेचं, लज्जेचं आणि संकोचाचं विशेषत: लपवण्याचं कारण नाही तर आनंदाचं, अभिमानाचं कारण असणार आहे. गर्भावस्थेत आपण कसे दिसतोय? या प्रश्नाला आता कायमचाच पूर्णविराम मिळेल. बेबीमून, बेबी बम्प फोटोेशूट हे नवे ट्रेण्ड भारतातही सेट होताय. एरवी गर्भवती अभिनेत्रीची एक झलक कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी छायाचित्रकार धडपडत असत आता तर त्या स्वत:हूनच कॅमेऱ्यासमोर येताहेत. सेलिब्रेटींमधल्या या धाडसी स्त्रीचं म्हणूनच जगालाही कौतुक वाटतं.