कॅट डिले व पॅट्रिक केल्टी यांचा ‘हॅप्पील ब्लू ईअर’ला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:12 IST
टीव्ही निवेदक कॅट डीले आणि तिचा पती पॅट्रिक केल्टी हे दोघेही यूनिसेफच्या 'हॅप्पी ब्लू ईअर' या अभियानाचे सर्मथन करीत आहेत.
कॅट डिले व पॅट्रिक केल्टी यांचा ‘हॅप्पील ब्लू ईअर’ला पाठिंबा
युनिसेफ या अभियानासाठी लोकांना प्रेरित करीत आहे. यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केली असून, त्यावरील 'हॅप्पी ब्लू ईअर' हा अँप डाऊनलोड करण्यासाठी लोकांना आवाहन केले जात आहे. कॅट डीले युनिसेफ ब्रिटनची ब्रँड अँम्बेसेडर असून, या अभियानासाठी पतीसोबत ती प्रयत्न करीत आहे. या अभियानाचा उद्देश सीरिया विवादात बळी ठरलेल्या लहान मुलांना मदतीसाठी आवाहन करणे हा आहे. सिरियामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व प्रत्येकाने आपले कोणी तरी नात्यातल्या व्यक्तींना कायमस्वरुपी गमावलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देणे हा यामगचा उद्देश आहे. यामुळे अनेक उध्दवस्त झालेल्या मनांना आधार मिळेल. यामुळे या अभियानात अनेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.