विराटची बम्पर दिवाळी खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:25 IST
विराट कोहलीने दिवाळीच्या मुहूर्ता आधीच महागड्या ऑडी कारची खरेदी केली.
विराटची बम्पर दिवाळी खरेदी
भारतात प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करणार्या विराट कोहलीने दिवाळीच्या मुहूर्ताआधीच महागड्या ऑडी कारची खरेदी केली.मोहालीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेस गुरुवारी प्रारंभ झाला आहे. भज्जी (हरभजन) च्या लग्नानंतर लगेच मोहालीत आलेल्या विराटने येथील शोरूममधून ही कार घेतली. ऑडी इंडिया कंपनीचे भारतातील प्रमुख ज्यो किंग यांनी या गाडीच्या चाव्या विराटच्या सुपूर्त केल्या. फॅशन आयकॉन असलेला विराट तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. भन्नाट स्पीडची त्याची आवड लपून राहिलेली नाही.त्याच्याकडे यापूर्वीच तीन महागड्या ऑडीचा ताफा आहे. त्यात आता या लेटेस्ट ए ८ एल डब्लू १२ काँट्रो आरामदायी ऑडीची भर पडेल. या गाडीची किंमत आहे फक्त दोन कोटी!