जगभरातील आकर्षून घेणारे सण, उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 01:12 IST
जगभरातील आकर्षून घेणारे सण, उत्सवपर्यटन ही नेहमीच चांगली कल्पना आहे. सण आणि उत्सवाच्या काळात जर तुम्ही फिरायला जात असाल, तर यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट कोणती असू शकते. यानिमित्ताने तुमच्या स्मृती अधिक रंगीबेरंगी होतील. पारंपरिक कपडे, संगीत, विविध खाद्यपदार्थ या साºयांचा आनंद लुटता येतो. जगभरातील आनंदाच्या या महोत्सवाची माहिती यानिमित्ताने देत आहोत...
जगभरातील आकर्षून घेणारे सण, उत्सव
पर्यटन ही नेहमीच चांगली कल्पना आहे. सण आणि उत्सवाच्या काळात जर तुम्ही फिरायला जात असाल, तर यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट कोणती असू शकते. यानिमित्ताने तुमच्या स्मृती अधिक रंगीबेरंगी होतील. पारंपरिक कपडे, संगीत, विविध खाद्यपदार्थ या साºयांचा आनंद लुटता येतो. जगभरातील आनंदाच्या या महोत्सवाची माहिती यानिमित्ताने देत आहोत...ताज महोत्सव, आग्राताज महोत्सवाच्या निमित्ताने ताजमहलला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे. हा १० दिवसांचा उत्सव असतो. १८ फेब्रुवारीपासून याची सुरुवात होते. देशभरातील सुमारे ४०० कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर पुरातन मुगल संस्कृतीच्या खुणाही जपण्यात येतात. जैसलमेर वाळवंट महोत्सव, राजस्थानतीन दिवस चालणाºया या महोत्सवात नृत्य, संगीत, हस्तकला प्रदर्शन आणि सर्वोत्कृष्ट ‘मिशा’ स्पर्धा आयोजित केल्या जातात. राजस्थान पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. खाद्यपदार्थ, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम याशिवाय उंटावरुन सफर, मिरवणूक, कॅमल पोलो, त्याशिवाय उंटांच्या रस्सीखेच स्पर्धाही घेण्यात येतात. जैसलमेर किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा होतात. २० फेब्रुवारीपासून याला प्रारंभ होतो.कुंभ मेळा, हरीद्वार१२ वर्षानंतर कुंभ मेळा आयोजित केला जातो. चार पवित्र ठिकाणी हा कुंभमेळा होतो. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. क्रमाने हा मेळा होतो. गोदावरी, क्षिप्रा, यमुना आणि गंगा नदीच्या किनारी याचे आयोजन असते. या मेळाव्याच्या ठिकाणी नागा साधूंचे आकर्षण असते. अंबुबाची जत्रा, आसामअंबुबाची जत्रा, ज्याला अंबुबाची महोत्सव असेही म्हटले जाते. मान्सूनमध्ये आसाममधील गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या मंदिरात दरवर्षी याचे आयोजन करण्यात येते. भारताच्या पूर्वेकडील भागात तांत्रिक शक्तीधारकांचा मोठा मेळावा या ठिकाणी भरतो. या चार दिवसाच्या काळात अनेक तांत्रिक बाबा आपले दर्शन देतात.हेमीस गुंफा यात्रा, लडाखहेमीस गुंफा यात्रा हा धार्मिक उत्सव असतो. भारतामधील बुद्ध धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. लडाखमधील हेमीस गुंफा येथे हा मेळावा होतो. पर्वतरांगांमधील हेमीस नॅशनल पार्क येथे १४ आणि १५ जुलै रोजी ही यात्रा भरते.पुष्कर मेळा, राजस्थानउंट आणि दररोजच्या सामानांच्या खरेदीसाठी लोक या पाच दिवसीय मेळ्यात गर्दी करतात. सुमारे ५० हजार उंट यात सहभागी झालेले असतात. अत्यंत सजवलेले, झुल घातलेले आणि स्वच्छ वाटणारे उंट दरवर्षी खरेदी-विक्रीस येतात. पुष्कर तलावात हजारो लोक स्नान करतात. मटका फोड, सर्वात लांब मिशी आणि वधूंच्या स्पर्धा घेतल्या जातात. दरवर्षी ८ नोव्हेंबरला हा मेळावा भरतो.