अदानी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 23:49 IST
करण आणि परिधी अदाणीं एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
अदानी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचे आगमन
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणींच्या घरी सध्या आनंदोत्सव सुरू आहे. कारण लवकरच ते आजोबा होणार आहेत. त्यांचा मुलगा करण आणि सून परिधी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.परिधीची आई वंदना श्रॉफ म्हणाल्या की, आम्ही खूप आनंदात आहोत. परिधी सध्या सात महिन्यांची गर्भवती असून माहेरी राहत आहे. मित्रपरिवाराच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून त्याचे काय नाव ठेवायचे यावरून चर्चा सुरू आहे.वंदना सांगतात, काही सुचवलेली नावे एवढी मजेशीर आहेत की विचारू नका. नाव कोणते निवडायचे यासाठी आम्ही छोटीशी स्पर्धा घेणार आहोत. पण जर परिधी आणि करणच्या मनात एखादे नाव आगोदरच असेल तर तेच ठेवण्यात येईल.नव्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. परिधीचा भाऊ ऋषभ व त्याची पत्नी सलोनीकडे तिची ‘बेबी शॉवर’ सेरेमनी होणार आहे. वडील सिरिल यांनीदेखील सुट्या घेतल्या आहेत. त्यांनी तर बाळासाठी एका स्पेशल गिफ्टदेखील प्लॅन केले आहे. त्यांनी स्वत: काढलेल्या स्केचेसचे एक बुक ते करण-परिधीला देणार आहेत.