फॅशन फॉलो करता आहात ना मग गाऊन आणि नाइट ड्रेसमधली लेटेस्ट फॅशन माहिती आहे ना?
By Admin | Updated: May 11, 2017 18:34 IST2017-05-11T18:34:16+5:302017-05-11T18:34:16+5:30
फॅशन फॉलोअर्ससाठी गाउन आणि नाइट ड्रेसही अपवाद कसे असतील? यातलाही फॅशन ट्रेण्ड माहिती असायलाच हवा.

फॅशन फॉलो करता आहात ना मग गाऊन आणि नाइट ड्रेसमधली लेटेस्ट फॅशन माहिती आहे ना?
- मोहिनी घारपुरे देशमुख
गाऊन आणि नाइट ड्रेस तसं म्हटलं तर या दोन्हीही प्रकारांमध्ये नवं असं काहीच नाही. किंबहुना त्यांची फॅशन आपल्यासाठी काही फार नवखी नाही. पण असं असलं तरीही नाईट वेअरमध्ये जे नवनवीन फॅब्रिक येत असतात आणि काही ढोबळ चेंजेस होतात त्याचीच अनेकींना आवड असते त्यामुळेच हे लहानसहान बदलही नाइटवेअरमध्ये नवा फॅशन ट्रेण्ड सेट करतात. फॅशन फॉलोअर्ससाठी मग गाउन आणि नाइट ड्रेसही अपवाद कसे असतील? यातलाही फॅशन ट्रेण्ड माहिती असायलाच हवा.
थोडं हे लक्षात असू द्या
1. स्वच्छ धुतलेला नाइटवेअरच वापरा
2. गाऊनच्या आतून परकर / पेटीकोट घालण्याची फॅशन कधीच मागे पडली आहे. त्याऐवजी जरा जाड कपड्याचा किंवा गडद रंगाचा गाऊन कम्फर्टेबली वापरा. अगदीच आॅड वाटत असेल तर गाऊनच्या आतून स्कर्ट स्लिप घाला पण परकर नकोत. ते अगदीच शॅबी दिसतात
3. सॅटीनचे नाईटड्रेसेस छानच दिसतात पण खूप काळजीपूर्वक हाताळावे लागतात. रफ टफ यूझसाठी सूती कपडेच बरे