अनुष्का, असिफ यांना 'ग्रॅमी'साठी नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:02 IST
भारतीय रागदारीचे वैशिष्ट्यशपूर्ण सादरीकरण अनुष्काने केल्याने सोलो अल्बम तर आसिफला ग्रॅमीसाठी नामांकन मिळाले आहे.
अनुष्का, असिफ यांना 'ग्रॅमी'साठी नामांकन
प्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर आणि दिग्दर्शक असिफ कापडिया यांना प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. अनुष्का शंकर (वय ३४) हिला बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम गटात तिच्या 'होम' या सोलो अल्बमला हे नामांकन मिळाले आहे. भारतीय रागदारीचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत या गटात मला तब्बल पाच वेळा नामांकन मिळाले आहे. त्यामुळे अर्थात मी आनंदी आहे. माझ्या यशात माझे सर्व सहकारी, मित्र यांचा वाटा आहेच. त्याशिवाय माझे वडील गुरु रविशंकर यांचीही मी कृतज्ञ आहे. 'होम'मध्ये दोन राग आहेत. त्यातील एक माझ्या पित्याने तयार केला आहे, असे अनुष्काने फेसबुक अकाऊंटवर केलेल्या कॉमेंटमध्ये म्हटले आहे. तर इंडो ब्रिटिश दिग्दर्शक असिफ कापडियाला 'अँमी' या डॉक्युमेंटरीत बेस्ट म्युझिक फिल्म कॅटॅगरीत नामांकन मिळाले आहे.