शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

ANTI VALENTINE'S WEEK : स्लॅप डे, किक डे, ब्रेक-अप डे -प्रेमाचा ज्वर कमी करणाऱ्या दिवसांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 18:51 IST

व्हॅलेंटाईन्स दिनाच्या एकदम विरुद्ध असा हा आठवडा असतो. विशेष म्हणजे १४ फे ब्रुवारीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे १५ फे ब्रुवारीपासून त्याला सुरुवात होते.

मागचा संपूर्ण आठवडा तुमच्याभोवती सतत प्रेमाच्या आणि केवळ प्रेमाच्या गप्पा, गोष्टी, चर्चा, वातावरण राहिले असेल. फुले, टेडी, चॉकलेट असं सगळं कसं गुलाबी-गुलाबी झाले असेल ना! पण आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अपेक्षेप्रमाणे ‘ग्रेट’ किंवा ‘यशस्वी’ ठरला नसेल.अनेकांनी हिंमत करून आवडणाऱ्या मुलीला प्रोपोज केले असेल मात्र त्यांना साफ नकार मिळाला असेल किंवा दुसऱ्याच दिवशी ब्रेक-अपही झाला असेल. प्रेमाची सुरुवात होण्यापूर्वीच त्याचा अंत झाला असेल. तुम्ही एवढ्या प्रेमाने दिलेले गिफ्ट समोरच्या व्यक्तीने आवडले नाही म्हणून फेकूनही दिले असेल. ज्या लोकांना वाटते की, व्हॅलेंटाईन वीकमध्ये ‘प्रेमाचा नको तेवढा उदोउदो केला जातो’ त्यांच्यासाठी ‘अँटी-व्हॅलेंटाईन वीक’ साजरा केला जातो. हो खरंच! व्हॅलेंटाईन्स दिनाच्या एकदम विरुद्ध असा हा आठवडा असतो. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे १५ फे ब्रुवारीपासून त्याला सुरुवात होते.त्याचा पहिला दिवस म्हणजे ‘स्लॅप डे’. त्यानंतर किक डे, परफ्युम डे, फ्लर्टिंग डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि अखेर ब्रेक-डे असा संपूर्ण हा ‘अँटी-व्हॅलेंटाईन वीक’असतो. थोडक्यात काय तर प्रेमाचा ज्वर कमी करणारा हा आठवडा असतो. कारण प्रत्येकासाठी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ फलदायी ठरेल, असे नाही.१५ फेब्रुवारी - स्लॅप डे१६ फेब्रुवारी - किक डे१७ फेब्रुवारी - परफ्युम डे१८ फेब्रुवारी - फ्लर्टिंग डे१९ फेब्रुवारी - कन्फेशन डे२० फेब्रुवारी - मिसिंग डे२१ फेब्रुवारी - ब्रेक-अप डेआता या प्रत्येक दिवशी काय करत असतात ते पाहू...* स्लॅप डे - १५ फेब्रुवारीस्लॅपचा शब्दश: अर्थ तर चापट मारणे असा होता. मात्र या दिवशी रागात किंवा चीड धरून चापट मारायची नसते. तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी स्वत:लाच त्याची जाणीव करून देण्याचा हा दिवस असतो. म्हणजे तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला गेला असेल तर त्या व्यक्तीला विसरण्यासाठी स्वत:ला समजावून सांगा.
* किक डे - १६ फेब्रुवारीया दिवशी कोणाला लाथ मारायची नसते तर तुमच्या जीवनात ज्या लोकांशी तुम्हाला नाते ठेवायचे नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून बाद करण्याचा हा दिवस. व्हॅलेंटाईन्स डे’नंतर दोन दिवसांनी तो साजरा केला जातो.
* पर्फ्युम डे - १७ फेब्रुवारीसंपूर्ण ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मध्ये जर आयुष्यात प्रेमाचा गंध न दरवळलेल्या लोकांसाठी हा दिवस असतो. दरवर्षी १७ फे ब्रुवारी रोजी पर्फ्युम डे साजरा करण्यात येतो. या दिवशी तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा छान पर्फ्युम खरेदी करू शकता. त्याच्या सुगंधामध्ये प्रेमाचे दु:ख विसरणे सोपे जाईल.
* फ्लर्टिंग डे - १८ फेब्रुवारी​​अजूनही प्रेमाची आशा धरून बसलेल्यांसाठी हा एक प्रकारे ‘सेकंड चान्स’ घेण्याचा दिवस असतो. आवडत्या व्यक्तीशी फ्लर्टिंग करून हळुवारपणे प्रेमाची मागणी करण्याचा हा दिवस. फ्लर्टिंग ही काही फार गंभीर नसते. त्यामुळे कोणी नकार जरी दिला तरी जास्त दु:ख मानण्याची गरज नाही.
* कन्फेशन डे- १९ फेब्रुवारीप्रेम आंधळे असते असे म्हणतात; परंतु प्रेमात खरेपणा असणे महत्त्वाचे. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून जर तुम्ही काही गोष्ट लपवून ठेवली असेल किंवा सांगितली नसेल तर ती आज सांगण्याचा दिवस आहे. ‘कन्फेशन डे’ला सगळे काही खरे सांगायचे असते. असे करणे कदाचित तुम्हाला अवघड वाटेल पण प्रेमाला सत्याचा आधार लागतो.
* मिसिंग डे - २० फेब्रुवारीकितीही नाही म्हटले तरी आपल्या प्रियजणांची आठवण आपल्याला येतच असते. त्यांनी जरी आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नसला तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतात. त्याच आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस. तुमच्या प्रियकर/प्रेयसीच्या आठवणींमध्ये रमण्याचा हा दिवस असतो.
* ब्रेक अप डे - २१ फेब्रुवारीव्हॅलेंटाईन वीकचे वातावरणच असे असते की, आपल्याला प्रेमात पडावेसे वाटते. कोणाची तरी आपल्याला साथ हवी असे वाटते; पण ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या सात दिवसांनंतर स्पष्ट होते की, ही रिलेशनशिप टिकणार की नाही? नाते बिघडून तुटण्यापेक्षा एका चांगल्या टप्प्यावर ते सोडून देणे कधीही चांगले. ‘ब्रेक अप डे’ला आपल्याला मागे जखडून ठेवणाऱ्या नात्यांना रामराम ठोकायचा असतो.