रेप प्रकरणी पूजाने सोनाक्षीवर केले होते आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 16:10 IST
टीव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा १० जून रोजी जयपूरला आली असता तिने मीडियाशी गप्पा केल्या.
रेप प्रकरणी पूजाने सोनाक्षीवर केले होते आरोप
टीव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा १० जून रोजी जयपूरला आली असता तिने मीडियाशी गप्पा केल्या. तिने यावेळी ‘अभि तो पार्टी शुरू हुई है’ या शोचे अनुभवदेखील शेअर केले. बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक पूजाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गंभीर आरोप लावले होते आणि हा वाद बरेच दिवस चर्चीला गेला होता. * पूजा नेहमी कोणत्यांकोणत्या कारणाने वादाच्या भोवºयात असतेच. यापूर्वीही पूजाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ती एका हॉटेल कर्मचाºयाला मारहाण करताना दिसली होती. * पूजाने सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनमवर एका प्रकरणात तिची छेड काढायला लावल्याचा आरोप केला होता. तिने पोलिसांत तक्रारसुध्दा दाखल केली होती. * मात्र, छेडछाडचा आरोप सिध्द होऊ शकला नाही. पोलिसांनी खोलीजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. शिवाय मेडिकल रिपोर्टमध्येसुध्दा असॉल्टचा खुलासा झाला नव्हता.