शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ALERT : पेट्रोल भरतानाची फसवणूक टाळण्यासाठी "या" १० गोष्टी आहेत महत्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 18:32 IST

आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत.

-Ravindra Moreउत्तर प्रदेशची राजधानीत नुकतेच पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ‘एसटीएफ’ च्या टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. त्यात पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांनी एक लीटर पेट्रोलची किंमत मोजून ९४० ते ९५० एमएल पेट्रोलच मिळत होतं. म्हणजे लीटरमागे ५० ते ६० एमएल पेट्रोलची चोरी होत होती. रोज ४० ते ५० हजार रुपये यातून हे कमवत होते म्हणजेच महिन्याला १२ ते १५ लाख रुपये लोकांना फसवून हे कमवत होते.आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत. १. मीटरवर लक्ष ठेवाजेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल तेव्हा मीटरकडे लक्ष द्यावे. बºयाचदा आपण चारचाकी वाहनात पेट्रोल भरताना वाहनाच्या खाली उतरत नाही. याचा फायदा तेथील कर्मचारी घेतात. २. रिजर्व्ह लागण्याआधी भरा पेट्रोल रिकाम्या टँकमध्ये पेट्रोल भरल्याने नुकसान होतं, हे आपणास कदाचित माहित नसेल. टाकी खाली असल्यास त्यात अधिक प्रमाणात हवा असते. त्यामुळे तुम्ही पेट्रोल भरतात तर हवेमुळे पेट्रोल तुम्हाला कमी प्रमाणात मिळतं. त्यामुळे रिजर्व्ह लागण्यापूर्वी पेट्रोल भरा.३. डिजीटल मीटर असणाºया पेट्रोल पंपवर पेट्रोल भरा जुन्या पेट्रोल पंप मशीनमध्ये गडबडी होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यासाठी पेट्रोल नेहमी डिजिटल मीटर असणाºया पंपावरच भरा. ४. मीटरवर शुन्य नेहमी बघा पेट्रोल भरतांना ते रिसेट केलं गेलं की नाही ते नक्की पाहा. कारण काही पेट्रोल पंपाचे कर्मचारी तुम्ही जेवढी रक्कम सांगतात तेवढ्याचं पेट्रोल भरतात. यासाठी मीटर पूर्ण शुन्यावर आणलं की नाही यावर लक्ष असू द्या.५. मीटर जोरात धावत असेल तर थांबवा पेट्रोल पंपवरच्या कर्मचाºयाला मीटरची स्पीड नार्मल करण्यासाठी सांगा. पेट्रोल भरतांना जर मीटर जोरात धावत असेल तर समजा काहीतरी गडबड आहे.६. आॅटो कट लागल्यानंतर नका भरू पेट्रोल आॅटो कट झाल्यानंतर तुमच्या गाडीच्या टाकीत कमी पेट्रोल जातं.  टाकी फुल करतांना आॅटो कट लागल्यास पेट्रोल पंपवाले राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरु का असं सांगतात. पण त्यांचे ऐकु नका.  ७. मीटर बंद झाल्यानंतर लगेच पाईप काढू देऊ नका तुम्ही पाहिलं असेल की पेट्रोल पंपावर तेल भरल्यानंतर पाईप लगेच काढला जातो. कर्मचारी पेट्रोल टाकल्यानंतर आॅटो कट होताच पाईप गाडीच्या टाकीतून बाहेर काढतात. त्यामुळे पाईपमध्ये वाचलेलं पेट्रोल तुमच्या टाकीत जात नाही.८. कधीही राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरु नका पेट्रोल पंप आधीच राउंड फिगरचे नंबर मशीनमध्ये फिक्स करुन ठेवतात. यामुळे जे लोकं ५०० किंवा १००० रुपयांचं पेट्रोल भरतात, त्यांचे नुकसान होते. यासाठी ५५० किंवा ११२५ अशा रुपयांचं पेट्रोल भरा. शक्य तेवढं डिजीटल पेमेंट करा. यामुळे पेट्रोल चोरी करणं अवघड होऊन जातं.९. एकांताच्या पेट्रोल पंपवर जाऊ नकाएकांताच्या ठिकाणी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरु नका. कारण अशा ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. यासाठी नेहमी अशा पेट्रोलपंपवर जाऊन पेट्रोल भरा जेथे नेहमी गाड्यांची वर्दळ असेल. अशा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतांना पाईपमधून आधी हवा बाहेर काढण्यासाठी सांगा. मग टाकीत पाईप टाकण्यास सांगा.१०. शंका असल्यास तक्रार कराजर तुम्हाला पेट्रोल चोरीची शंका आल्यास लगेचच पेट्रोल पंपच्या मॅनेजरकडून कंप्लेंट बुक मांगून लिखित तक्रार दाखल करा. जर तुम्हाला कंप्लेंट बुक दिलं जात नसेल तर कंपणीच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल करा.