शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

ALERT : ‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या हल्ल्यापासून संगणकाला कसे वाचवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 16:03 IST

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतासह सुमारे १०० देश या व्हायरसने प्रभावित झाले आहेत.

-Ravindra Moreमाहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतासह सुमारे १०० देश या व्हायरसने प्रभावित झाले आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्टने सांगितले की, जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले. विशेष म्हणजे या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे पुर्णत: विस्कळीत झाली. अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे आॅपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.काय आहे नेमके ‘रॅन्समवेअर’? तुम्ही संगणक किंवा लॅपटॉपवर काम करीत असताना अचानक एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची आॅपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.काय काळजी घ्याल? * सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.* इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .* संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते. जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .* तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .* स्मार्टफोनला ही धोकासंगणकांप्रमाणे स्मार्टफोनला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एॅप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या. शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा. कुठलीही ‘ए पी के’ फाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाल करू नका.