मुंबईच्या विजयानंतर या क्रिकेटरची गर्लफ्रेंड दिसली आयपीएल ट्रॉफीसह !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 12:50 IST
अनेक जणांना ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न पडत होता, मात्र ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून .....
मुंबईच्या विजयानंतर या क्रिकेटरची गर्लफ्रेंड दिसली आयपीएल ट्रॉफीसह !
मुंबई इंडियन्सने रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा खिताब जिंकला. हा विजय मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. शिवाय या आनंदात भर पडावी म्हणून तसेच ट्रॉफीसह फोटोही काढले. मात्र यादरम्यानच एक मिस्ट्री गर्लचा फोटो आयपीएलच्या ट्रॉफीसह सोशल मीडियावर व्हायरल झाला.अनेक जणांना ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न पडत होता, मात्र ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर कृणाल पांड्याची गर्लफ्रेंड आहे. तिचे नाव पंखुडी शर्मा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी लवकरच कृणाल आणि पंखुडी लग्न बंधनात अडकणार आहेत.