उन्हाळ्यातल्या संध्याकाळी आफ्रिकन प्रिंटसची फॅशन
By Admin | Updated: April 28, 2017 17:18 IST2017-04-28T17:18:44+5:302017-04-28T17:18:44+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात जर बीचवर वगैरे फिरायला जाणार असाल तर आफ्रिकन वॅक्स प्रिंट्सची रंगसंगती छान दिसते.

उन्हाळ्यातल्या संध्याकाळी आफ्रिकन प्रिंटसची फॅशन
मोहिनी घारपुरे-देशमुख
उन्हाळ्याच्या दिवसात भडक रंग वापरण्यास अनेकजणी फारशा उत्सुक नसतात. याचं कारण बाहेर कडकडीत ऊन आणि त्यात आपणही जर का भडक कपडे घातले तर डोळ्यांना त्याचा त्रासच जास्त होऊ शकतो. मात्र असं असलं तरीही संध्याकाळच्या वेळी मात्र रंगीबेरंगी कपडे आणि प्लेन रंग असं कॉम्बिनेशन घालायला हरकत नाही. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात जर बीचवर वगैरे फिरायला जाणार असाल तर अशी रंगसंगती छान दिसते. अशा रंगीबेरंगी कपड्यांमध्ये सध्या आफ्रिकन वॅक्स प्रिंट्सची चलती आहे. या प्रकारच्या प्रिंट्स आफ्रिकना स्त्रिया नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भाग म्हणून वापरतात. शहरं, तिथल्या इमारती किंवा काही नामांकीत व्यक्तींची चित्रं या प्रिंट्समध्ये विशेषकरून आढळतात. बाटीक प्रिंटच्याच प्रकारातील ही वॅक्स प्रिंट असते. आजघडीला फॅशन जगतात या प्रिंट्सला जगभरातील अनेक फॅशन डिझायनर्सनी पसंती दिली आहे. आपल्याकडेदेखील या प्रिंट्स अनेकींच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच आढळतील. परंतु या प्रिंट्सचे कपडे वापरताना एस्थेटीक सेन्स ध्यानात ठेऊनच मग ते वापरायला हवेत अन्यथा एकदम बटबटीत, गॉडी लुक येऊ शकतो .