‘क्युलोटस’ एकदा घालून तर बघा!
By Admin | Updated: April 25, 2017 16:35 IST2017-04-25T16:31:11+5:302017-04-25T16:35:18+5:30
समर हॉट सीझनमध्ये घराबाहेर पडताना उकाड्यानं जीव हैराण होणार नाही असेच कपडे निवडले जातात. अशाच कपड्यांपैकी एक अत्यंत लोकिप्रय आणि महिलावर्गासाठी अत्यंत कम्फर्टेबल स्टायलिश अटायर म्हणजे क्युलोट्स

‘क्युलोटस’ एकदा घालून तर बघा!
मोहिनी घारपुरे-देशमुख
समर हॉट सीझनमध्ये घराबाहेर पडताना उकाड्यानं जीव हैराण होणार नाही असेच कपडे निवडले जातात. अशाच कपड्यांपैकी एक अत्यंत लोकिप्रय आणि महिलावर्गासाठी अत्यंत कम्फर्टेबल स्टायलिश अटायर म्हणजे क्युलोट्स आणि त्यावर कूलसा टॉप. क्युलोट्स म्हणजे थ्रीफोर्थ उंचीच्या ढगळ पँट्स. या पँट्स दुरून पाहताना स्कर्टसारख्या दिसतात. परंतु प्रत्यक्षात त्यांचा लूक फारच निराळा असतो.अनेकदा केप्रिज आणि क्युलोट्स सारख्याच असल्याची गल्लत केली जाते परंतु दोन्हीमध्ये फारच फरक आहे.
काहीशा ढगळ आणि पायाच्या घोट्यापर्यंतच्या या पँट्स (ट्राऊझर्स) अत्यंत आरामदायी आणि फॅशनेबल दिसतात. किंबहुना यंदा या सीझनमध्ये इंटरनॅशनल रँपवरही या क्युलोट्स झळकल्या आहेत. मात्र क्युलोट्स घालताना विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा ‘फॅशन डिझास्टर’ व्हायला काहीच वेळ लागणार नाही.