सौरऊर्जेवर चालणाºया कारमधून तीन हजार किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:23 IST
सौर-कारमधून 'सच अ लाँग जर्नी'बेंगळूरू स्थित एका ६३ वर्षीय व्यक्तीने दिल्ली येथे होणार्या 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेअर'मध्ये (आयआयएसएफ) सहभागी होण्यासाठी स्वत: बनविलेल्या व सौरऊर्जेवर चालणार्या कारमधून सुमारे तीन हजार किमी प्रवास केला.
सौरऊर्जेवर चालणाºया कारमधून तीन हजार किमी प्रवास
. सईद सज्जन अहमद असे या अवलियाचे नाव असून बेंगळूरू ते दिल्ली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना ३0 दिवस लागले.सईद यांना घरच्या परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले. फळ विक्री करत करत त्यांनी पुढे ईलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग शॉप सुरू केली. ट्रान्सिस्टर, टेप रेकॉर्डर, टीव्ही अशा विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्याच्या अनुभवातून त्यांनी तांत्रिक ज्ञान मिळवले. यातून मग त्यांना वीजेवर चालणारी गाडी बनविण्याची प्रेरणा मिळाली. आधी मोटार सायकल, मग रिक्षा आणि नंतर चारचाकी गाड्या स्वत: मॉडिफाय करू लागले. ते सांगतात, 'मला शिक्षण जरी पूर्ण करता नाही आले मात्र शिकण्याची ओढ काही कमी झाली नाही. वय होण्याआधीच समाजासाठी, निसर्गसाठी काही तरी करावे या हेतूने मी ही सौर ऊज्रेवर चालणारी कार तयार केली आहे.'