शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:20 IST

Fact Check : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये योगी "बॅनर हटवा अन्यथा मी तुम्हाला कायमचं बेरोजगार करेन" असं म्हणताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.

Claim Review : "बॅनर हटवा अन्यथा मी तुम्हाला कायमचं बेरोजगार करेन"
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: The Quint Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी "बॅनर हटवा अन्यथा मी तुम्हाला कायमचं बेरोजगार करेन" असं म्हणताना दिसत आहे.

दावा - संपूर्ण संदर्भ न देता सोशल मीडियावर अलीकडेच हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.

या पोस्टचे अर्काइव येथे पाहा

(सोर्स – स्क्रीनशॉट)

(तुम्ही येथे, येथे आणि येथे समान दावे करणाऱ्या इतर पोस्टचे अर्काइव पाहू शकता.)

हा दावा खरा आहे का? नाही, हा दावा खरा नाही.

योगी आदित्यनाथ यांचा हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या रॅलीचा नसून 2019 चा आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे योगींच्या रॅलीत बीटीसीचे विद्यार्थी निदर्शने करण्यासाठी आले होते.

त्यांना पाहून योगी आदित्यनाथ म्हणाले होते, "बॅनर उतरवा नाहीतर तुम्ही कायमचे बेरोजगार व्हाल. त्यांना हटवा, अशा लोकांना आधी बाहेर काढा."

आम्ही सत्य कसं शोधलं? 

आम्ही व्हायरल व्हिडिओला कीफ्रेममध्ये विभाजित केलं आणि Google लेन्सच्या मदतीने इमेज सर्च केल्या. आम्हाला X (पूर्वी Twitter) युजर्सकडून 2019 ची पोस्ट सापडली ज्यामध्ये हा व्हिडीओ होता.

याशिवाय, X (पूर्वीचे ट्विटर) वरील इतर युजर्सनी देखील 2019 मध्ये हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ती पोस्ट तुम्ही इथे पाहू शकता.

न्यूज रिपोर्ट्स : या प्रकरणाशी संबंधित कीवर्ड शोधताना, आम्हाला जनसत्ताचा एक रिपोर्ट सापडला ज्याची हेडलाईन होती "बैनर नीचे कर दो नहीं तो हमेशा के लिए बेरोजगार रह जाओगे, विरोध प्रदर्शन को लेकर बोले सीएम योगी"

जनसत्ताने 19 फेब्रुवारी 2021 रोजी ही बातमी प्रसिद्ध केली होती.

(स्रोत – स्क्रीनशॉट/जनसत्ता/क्विंट हिंदी)

वनइंडिया हिंदी नावाच्या वेबसाईटनेही योगी आदित्यनाथ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. हे देखील 19 फेब्रुवारी 2020 रोजी अपलोड केले होते.

निष्कर्ष 

योगी आदित्यनाथ यांचा जुना व्हिडीओ नुकताच लोकसभा निवडणुकीदरम्यान व्हायरल होत आहे.

(सदर फॅक्ट चेक The Quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUnemploymentबेरोजगारीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४