Created By: BOOMTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्यात त्यांच्या स्वागताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही लोक ढोल आणि मंजिरेसह पीपली लाइव्ह चित्रपटातील 'महंगाई डायन खाए जात है' गाणं गाताना दिसत आहे.
बुमच्या तपासात हा व्हिडीओ एडिट केला असल्याचे समोर आलं. मूळ व्हिडीओमध्ये लोक ढोल मंजिरेसह भोजपुरी लोकगीत गीत-गवई गात होते. यावेळी ते स्वागत है, मोदी जी को हम स्वागत करते हैं. धन्य है, धन्य है, देश हमारा हो... मोदी जी पधारे हैं. जन्मों का नाता है. जय मॉरीशस बोलो, जय भारत, असं म्हणत होते.
फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना एका युजरने, मोदींच्या मॉरिशस दौऱ्यातही महंगाई डायनचा डंका वाजवला जात आहे. आता सांग असा अपमान कोणी करतो का?' असं म्हटलं.
हा व्हिडीओ सगळ्यात आधी एक्सवर NetaFlixIndia नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता.
फॅक्ट चेक
एक्सवर व्हिडीओ शेअर करणाऱ्या NetaFlixIndiaने एका युजरला रिप्लाय करताना सांगितले की हा व्हिडीओ एडिटेड आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १२ मार्च २०२५ रोजी मॉरिशसचा दोन दिवसीय राजकीय दौरा केला होता. मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या लोकांनी 'गीत-गवई' हे पारंपारिक भोजपुरी लोकगीत गाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. हे गाणे विशेषत: लग्नसमारंभ आणि शुभ प्रसंगी गायले जाते, ज्यामध्ये ढोलक, मंजिरा, हार्मोनियम, खंजरी आणि झांज ही वाद्ये वापरली जातात.
पंतप्रधान मोदींनी ११ मार्च २०२५ रोजी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये लोक ढोल-ताशांसोबत गाणे म्हणत होते, 'स्वागत है, मोदी जी को हम स्वागत करते हैं. धन्य है, धन्य है, देश हमारा हो... मोदी जी पधारे हैं. जन्मों का नाता है. जय मॉरीशस बोलो, जय भारत.'
'मॉरीशसमध्ये एक संस्मरणीय स्वागत. येथील खोल सांस्कृतिक संबंध विशेषत: गीत-गवईच्या सादरीकरणातून दिसून येतो. भोजपुरीसारखी समृद्ध भाषा आजही मॉरिशसच्या संस्कृतीत जिवंत आहे, हे कौतुकास्पद आहे.
न्यूज एजन्सी एएनआय आणि इतर अनेक वृत्तवाहिन्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला होता.
पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भारत आणि मॉरिशसने व्यापार, सागरी सुरक्षा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर' या सन्मानानेही गौरवण्यात आले.
(सदर फॅक्ट चेक बूम या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)