शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp: व्हॉट्सॲपवर तीन लाल टिक खरंच येणार का? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:13 IST

माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम (आयटी रूल्स) अंमलात आल्यानंतर आता व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजेसवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत, सरकारची नजर या मेसेजेसवर राहणार आहे, सरकारची बदनामी करणारे संदेश अग्रेषित केले तर लगेचच कारवाईचा दंडुका बसणार आहे इ. इ. डझनभर सूचना असलेला एक मेसेज सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे.

माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम (आयटी रूल्स) अंमलात आल्यानंतर आता व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजेसवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत, सरकारची नजर या मेसेजेसवर राहणार आहे, सरकारची बदनामी करणारे संदेश अग्रेषित केले तर लगेचच कारवाईचा दंडुका बसणार आहे इ. इ. डझनभर सूचना असलेला एक मेसेज सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे...काय म्हटले व्हायरल मेसेजमध्ये?२ निळ्या रेषा व १ लाल रेष म्हणजे सरकार तुमच्याविरोधात कारवाई करू शकते. ३ लाल रेषा म्हणजे सरकारने तुमच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहेसरकारची बदनामी करणारा मेसेज अग्रेषित केला तर मूळ संदेश कोणाकडून आला याची चौकशी केली जाईल. धार्मिक द्वेष पसरवणारा मेसेज व्हायरल केला तर तुम्हाला अटक होईल.तुमचे सर्व कॉल्स रेकॉर्ड केले जाणार आहेत. तुमचा मोबाइल थेट केंद्रीय मंत्रालयाच्या यंत्रणेशी जोडला जाणार आहे.अनेकदा अग्रेषित झालेला हा मेसेज खरा आहे?नाही, व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. हा निव्वळ खोडसाळपणा असून असे कोणतेही निर्बंध व्हॉट्सॲप युझर्सवर लागू होणार नाहीत. व्हॉट्सॲप युझर्सना भीती दर्शवणारा हा मेसेज गेल्या वर्षीही व्हायरल झाला होताव्हॉट्सॲप युझर्सला कोणताही धोका नाहीसंबंधित संदेश व्हायरल झाला असला तरी त्यात काही तथ्य नाही.  कारण व्हॉट्सॲपने संदेश देवाणघेवाणी संदर्भातील कोणतेही नवीन नियम आणलेले नाहीत.  त्यामुळे दोन निळ्या रेषा आणि एक लाल रेष वगैरेच्या संदेशापासून युझर्सनी निश्चिंत रहावेएक रेष म्हणजे तुमचा मेसेज पाठवला गेला. दोन रेषा म्हणजे तो संबंधिताकडे पोहोचला. आणि दोन निळ्या रेषा म्हणजे संबंधित व्यक्तीने तो मेसेज वाचला, हेच कायम राहणार आहेव्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम तुमची छायाचित्रे, मेसेजेस, फाइल्स आणि इतर माहिती त्यांच्या स्वार्थासाठी वापरणार असल्याचा एक मेसेज गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. मात्र, तो खोटा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते- व्हॉट्सॲपवरील मेसेज कोणीही वाचू शकते का?व्हॉट्सॲपवर दोन व्यक्तींमधील चॅटिंग गोपनीयच राहतेव्हॉट्सॲपला एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सुविधा आहेत्यामुळे व्हॉट्सॲपवर तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवलेला मेसेज, फोटो, व्हॉइस मेसेज, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स केवळ व्हॉट्सॲपच नव्हे तर फेसबुक किंवा सरकारही पाहू वा वाचू शकत नाहीत्यामुळे नव्या आयटी रूल्सच्या अंमलबजावणीनंतर आपल्या चॅटिंगवर गदा येणार आहे, अशी भीती युझर्सनी बाळगू नये

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप