शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: तुमच्याकडे आहे का ५०० ची नोट? सावध व्हा! सरकारनं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 10:52 IST

दोन नोटांमधला फरक दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली: तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट आहे का? तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या ५०० रुपयाच्या नोटेबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका विशिष्ट प्रकारची ५०० रुपयांची नोट तुमच्याकडे असल्यास सावध व्हा असं आवाहन या व्हिडीओमधून करण्यात येत आहे. याबद्दल आता सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत ५०० रुपयांच्या दोन नोटांमधला फरक सांगण्यात येत आहे. खऱ्या आणि बोगस नोटांमधला फरक सांगत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात पीआयबीनं फॅक्ट चेक करत सत्य सांगितलं आहे.

पीआयबीकडून फॅक्ट चेक५०० रुपयांची अशी कोणतीही नोट स्वीकारू नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीच्या बाजूला नसून गांधीजींच्या फोटोच्या शेजारी आहे, अशी माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र यामध्ये तथ्य नाही. ५०० च्या दोन्हीही नोटा वैध आहेत, असं पीआयबीनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ बोगस आहे. त्यातील माहिती खरी नाही, असं पीआयबीनं सांगितलं आहे.