शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Fact Check Aryan Khan: आर्यन खानने नशेमध्ये विमानतळावर केली लघुशंका? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 13:13 IST

Aryan Khan viral video: सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात दिसणारा व्यक्ती हा आर्यन खान असल्याचे सांगितले जात आहे. हा कथित आर्यन खान नशेमध्ये आहे आणि अमेरिकेच्या विमानतळावर लघुशंका करताना दिसत आहे.

गेल्या वर्षी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्रूझ रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेतले होते. सुमारे एक महिना आर्यन खान तुरुंगात होता. आर्यनवर कारवाई करणारे एनसीबीचे मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे यांची वादांमुळे नुकतीच डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा आर्यन खान चर्चेत आला आहे.

सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात दिसणारा व्यक्ती हा आर्यन खान असल्याचे सांगितले जात आहे. हा कथित आर्यन खान नशेमध्ये आहे आणि अमेरिकेच्या विमानतळावर लघुशंका करताना दिसत आहे. या व्यक्तीला सोशल मीडियावर लोक आर्यन खान म्हणत आहेत आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. अनेकजण आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत. तर काही जण आर्यन खानचे नाव बदनाम केले जात असल्याचे म्हणत आहेत. 

आता या व्हिडीओमध्ये खरोखरच आर्यन खान आहे की दुसरा कोणी? तर तो आर्यन खान नसून प्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा 'ट्वाइलाइ' मध्ये काम केलेला अभिनेता ब्रॉनसन पेलेटियर आहे. हा व्हिडीओ २०१२ मधील आहे, जेव्हा ब्रॉनसन लॉस एंजेलिसच्या विमानतळावर नशेमध्ये होता आणि लोकांसमोरच त्याने लघुशंका केली होती. या प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली होती. 

आर्यन खानला २०२१ वर्ष जगातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रेटिंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर घेऊन गेले आहे. आर्यन खानला ३ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवरून ड्रग केसमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर कित्येक प्रयत्नांनंतर आर्यनला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन दिला होता. जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात राहिला होता. या प्रकरणामुळे आर्यन खानला गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सेलिब्रेटींमध्ये दुसरा क्रमांक मिळाला. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खान