शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:33 IST

Fact Check: ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता.

Created By: NewscheckerTranslated By: ऑनलाइन लोकमत

उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या चेंबुर येथील रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा केला जात होता. ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. याबाबत फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेने देसाई यांच्या इन्स्टा पोस्टमधील व्हिडीओ पाहिला व रोडशो १४ मे २०२४ ला झाल्याचे समोर आले. 

या व्हिडीओचे अर्काईव्ह व्हर्जन तुम्ही इथे पाहू शकता...

हा रोड शो २० मे रोजी मतदान होणार असल्याने आयोजित करण्यात आला होता. या रोडशोचे ठिकाण, तेथील फ्लायओव्हर आणि त्यावरील होर्डिंग्सदेखील या व्हिडीओत पाहण्यात आली. तसेच फॅक्ट चेकरना हे लोकेशन गुगल मॅपमध्येही सापडले. त्यानंतर न्यूजचेकरने "शिवसेना पाकिस्तानी ध्वज अनिल देसाई रॅली" अशा कीवर्डचाही शोध घेतला. आम्हाला अशा घटनेबद्दल कोणत्याही विश्वासार्ह बातम्या मिळाल्या नाहीत. व्हायरल व्हिडिओमधील ध्वजावर पाकिस्तानच्या ध्वजाची वेगळी पांढरी पट्टी नाही. ईदच्या मिरवणुकीदरम्यान उंचावलेल्या इस्लामिक ध्वजांसारखेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ध्वजात पांढरा चंद्रकोर आणि मध्यभागी तारा आहे. त्याच्याभोवती लहान पांढऱ्या ताऱ्यांनी वेढलेले आहे. अशा प्रकारे व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. 

निष्कर्ष - सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याची सत्यता पडताळली असता उद्धव ठाकरे गटाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा खोटा आहे.  

(सदर फॅक्ट चेक Newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPakistanपाकिस्तानmumbai-south-central-pcमुंबई दक्षिण मध्य