शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:45 IST

Fact Check: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Claim Review : अखिलेश यादव यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: BoomTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे पाच टप्पे पूर्ण होत आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता सांगतेकडे जात असून, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. अद्याप काही टप्पे बाकी आहेत. यातच आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र झाले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीशी या व्हिडिओचा संदर्भ जोडला जात असून, निवडणूक निकाल पाहिल्यानंतर अखिलेश यादव पंतप्रधान मोदींना भेटायला गेले, असा दावा युजर्सकडून करण्यात येत आहे. 

या व्हायरल व्हिडिओची सतत्या तपासली असता, हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ २०१४ मधील असून, अखिलेश यादव तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. एक फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, निवडणुकांचे निकाल कळताच अखिलेश यादव हे प्रकरण मिटवण्यासाठी मोदींच्या दरबारात पोहोचले.

(अर्काइव्ह पोस्ट)

फॅक्ट चेक

या  व्हायरल व्हिडिओशी संबंधित कीवर्डसह YouTube वर शोधण्यात आले. आम्हाला हा व्हिडिओ १३ जून २०१४ रोजी पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला आढळला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पीएम मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मार्च २०१२ ते मार्च २०१७ या काळात अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अखिलेश यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पीएम मोदी यांच्या भेटीचा हा व्हिडिओ डीडी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरही शेअर करण्यात आला होता. याशिवाय, आम्हाला अखिलेश यादव आणि पीएम मोदी यांच्या भेटीचे वृत्त देणारा कोणताही अन्य विश्वसनीय सोर्स अलीकडे आढळून आलेला नाही. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष विरोधी पक्षांच्या भारत आघाडीचा भाग आहे.

निष्कर्ष

अखिलेश यादव आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचा हा व्हिडिओ १० वर्षे जुना असून, सदर व्हिडिओ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचा दावा खोटा, चुकीचा आहे.

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीAkhilesh Yadavअखिलेश यादवSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल