शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Fact Check: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या योगदानाची स्तुती करणारा मोहन भागवत यांचा VIDEO जुना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 16:13 IST

Fact Check, Mohan Bhagwat Viral Video: सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते काँग्रेसचे कौतुक करताना दिसत आहेत. 

Claim Review : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या स्वातंत्र्यालढ्यातील काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक केले.
Claimed By : Twitter User
Fact Check : दिशाभूल

Created By: Logically FactsTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check, Mohan Bhagwat Viral Video: देशभरात सध्या लोकसभा निडणुकीची धामधूम सुरु आहे. यातील सात पैकी पाच टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. आणखी दोन  टप्प्यातील मतदान झाल्यानंतर ४ जूनला देशात कुणाचे सरकार येणार, यावर निर्णय होणार आहे. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर सध्या वेगवेगळ्या व्यासपीठावर आपली मते मांडत आहेत. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते काँग्रेसचे कौतुक करताना दिसत आहेत. जाणून घेऊया या व्हिडीओबाबत नक्की दावा काय आणि त्यामागील सत्य काय?

दावा काय आहे?

भारतात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर, मोहन भागवत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. त्यामध्ये ते भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक करताना दिसत आहेत. पाचव्या टप्प्यानंतर निवडणुकीतील बदलते वारे जाणवल्याने मोहन भागवत काँग्रेसच्या योगदानाची आठवण करत असल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे.

व्हिडिओमध्ये मोहन भागवत असे म्हणताना ऐकू येत आहेत की, "आपल्या देशातील लोकांमध्ये राजकीय सामंजस्य कमी आहे. सत्ता कोणाकडे आहे, त्याचे महत्त्व काय आहे हे लोकांना माहिती असते. पण देशातील लोकांमध्ये राजकीय प्रबोधन व्हायला हवे. याच हेतुने काँग्रेसच्या रूपाने संपूर्ण देशात एक मोठी चळवळ उभी राहिली, ज्याच्या प्रेरणेने आपल्या जीवनाला प्रेरणा मिळत आहे आणि त्या प्रवाहाने सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या वाटेवर नेण्याचे काम केले आहे."

गुजरात काँग्रेस एससी सेलचे अध्यक्ष हितेंद्र पिठाडिया यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, "पाचव्या टप्प्यानंतर, RSS चे मोहन भागवत यांनाही काँग्रेसचे योगदान आठवू लागले.!! मोदी जात आहेत.. (काँग्रेसप्रणित) इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे." पोस्टची अर्काईव्ह लिंक येथे पाहा. इतर पोस्टसाठी येथे क्लिक करा.

हा व्हिडिओ सर्वप्रथम काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी २१ मे २०२४ रोजी शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे काँग्रेसबद्दलचे मत ऐकण्यास सांगितले होते. नंतर काही वापरकर्त्यांनी सध्याच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ सप्टेंबर 2018 मधला आहे जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या परिषदेत भारताच्या स्वातंत्र्यालढ्यातील काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक केले होते.

सत्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओवर 'एचटी' (हिंदुस्तान टाईम्स) आणि वृत्तसंस्था एएनआयचा लोगो दिसत आहे. एक हिंट घेऊन, आम्ही हिंदुस्तान टाइम्सचे YouTube चॅनेल शोधले आणि त्यात आढळले की हा व्हिडिओ ( अर्काईव्ह लिंक ) 18 सप्टेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये नवी दिल्ली नावाखाली लिहिलेली ही तारीख व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

हिंदुस्तान टाइम्सने व्हिडिओसह माहिती दिली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवी दिल्लीत तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करत आहे. या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत मोठी भूमिका बजावली आणि भारताला अनेक महान व्यक्ती दिल्या. 

व्हिडिओमध्ये 18 सेकंदांच्या वेळेवर, मोहन भागवत व्हायरल व्हिडिओमध्ये तंतोतंत त्याच गोष्टी बोलताना दिसतात. ते म्हणतात, "...आपल्या देशातील लोकांमध्ये राजकीय बुद्धिमत्ता कमी आहे. सत्ता कोणाकडे आहे, त्याचे महत्त्व काय आहे, याविषयी लोकांना कमी माहिती आहे. देशातील लोकांमध्ये राजकीय प्रबोधन व्हायला हवे आणि त्यामुळे काँग्रेसच्या रुपाने एक मोठी चळवळ उभी राहिली. त्यातून देशाला अनेक महापुरुष मिळाले. ज्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आपल्या जीवनाला प्रेरणा देते आणि त्या सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या वाटेवर नेण्यात मोठे योगदान देते."

18 सप्टेंबर 2018 रोजी ANI च्या YouTube चॅनलवर देखील हाच व्हिडीओ (अर्काईव्ह लिंक) अपलोड केलेले दिसतो.

RSS ने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे “भारताचे भविष्य: एक RSS परिप्रेक्ष्य” या विषयावर 3 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती. 17 सप्टेंबर 2018 रोजी मोहन भागवत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. मोहन भागवत यांचे संपूर्ण भाषण संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर 18 सप्टेंबर 2018 रोजीच्या व्हिडिओमध्ये (अर्काईव्ह लिंक) उपलब्ध आहे.

व्हिडिओमध्ये, मोहन भागवत 1857 च्या क्रांतीच्या अपयशाबद्दल आणि त्यानंतर देशातील चिंतन आणि मंथनाच्या चार प्रवाहांबद्दल बोलतात. त्यात गदर क्रांती आणि सुभाषचंद्र बोस यांचा सशस्त्र संघर्ष, देशभरातील लोकांमध्ये राजकीय जाणीवेतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष, सामाजिक सुधारणा आणि मूळ स्तंभांकडे परत जाण्याची प्रवृत्ती यांचा उल्लेख आहे. (हा भाग व्हिडिओमध्ये 18:58 ते 23:20 दरम्यान पाहता येईल.)

(निष्कर्ष: आमच्या आतापर्यंतच्या तपासावरून हे स्पष्ट झाले आहे की, भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसच्या भूमिकेवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या टिप्पणीचा हा व्हिडिओ 2018 चा आहे. याचा सध्याच्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे व्हायरल केलेला दावा दिशाभूल करणारा आहे.)

(सदर फॅक्ट चेक 'Logically Facts' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसIndiaभारत