शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: बेरोजगारांना मोदी सरकार देतंय महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता?; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

By कुणाल गवाणकर | Updated: January 28, 2021 16:53 IST

Fact Check: १८ ते ५० वर्षांमधील बेरोजगारांना आर्थिक मदत दिली जात असल्याचा दावा

इंटरनेट, सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक गोष्टी वेगानं व्हायरल होतात. व्हॉट्स ऍपवर अनेकदा सत्यता न पडताळताच मेसेज फॉरवर्ड केले जातात. यातले बरेचसे मेसेज खोटे असतात. त्यात कोणतंही तथ्य नसतं. केंद्र सरकार १८ ते ५० वर्षांमधील बेरोजगारांना दर महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता देत असल्याचा मेसेज आता व्हायरल झाला आहे. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेच्या अंतर्गत ही आर्थिक मदत दिली जात असल्याचा दावा केला जात आहे.१५ ऑक्टोबरपर्यंत देशातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश?; काय आहे या मेसेजमागील सत्य!व्हॉट्स ऍपवर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर बेरोजगारांना आर्थिक मदत मिळेल, असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. '१८ ते २५ वयोगटात येणाऱ्यांना महिन्याला १५०० रुपये, २५ ते ३० वयोगटात मोडणाऱ्यांना २००० रुपये, ३१ ते ३५ वयोगटातल्यांना ३००० रुपये, ३६ ते ४५ वयोगटातील ३५०० हजार रुपये, तर ४४ ते ५० वयोगटातील लोकांना ३८०० रुपयांचा भत्ता देण्यात येईल,' अशी माहिती मेसेजमध्ये आहे.15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासाकाय आहे वस्तुस्थिती?प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनं (पीआयबी) फॅक्ट चेक करून व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचं सांगितलं आहे. सरकार अशा प्रकारचा कोणताही भत्ता जाहीर केलेला नाही. सरकारनं अशी कोणतीही योजना आणलेली नाही, असं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पीआयबीकडून करण्यात आलं आहे. बेरोजगारांना भत्ता दिला जाणार असल्याचा मेसेज खोटा असल्याची माहिती पीआयबीनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 'केंद्र सरकार बेरोजगारांना दर महिन्याला ३८०० रुपयांपर्यंतचा भत्ता देत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही,' असं पीआयबीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी