शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Fact Check : मोईन अलीची धमकी?; Nupur Sharma प्रकणावरून भारताने माफी मागावी अन्यथा IPLवर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:08 IST

Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय.

Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात मुस्लिम बांधवांनी तीव्र आंदोलन केले होते. शनिवारी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ अहमदाबादमधील सरखेज गांधीनगर महामार्गावर शेकडो लोकं जमा झाले. नुपूर शर्मा यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याच्या नावाने एक ट्विट व्हायरल झालं आहे. त्यात त्याने या प्रकरणी भारताने माफी मागावी अन्यथा इंडियन प्रीमिअर लीगवर बहिष्कार घालणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय भारतात क्रिकेट खेळण्यास येणार नसल्याचेही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून 16 देशांनी भारत सरकारवर टीका केली आहे. त्यात इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाने व्हायरल झालेल्या ट्विटने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवली आहे. पण, हे ट्विटर अकाऊंट मोईन अलीचे नाही आणि ते आता सस्पेंड  केले गेले आहे. याचा अर्थ ते अकाऊंट अधिकृत नाही.  

'@Moeen_Ali18' या ट्विटर हँडलवरून हे ट्विट व्हायरल झाले. त्यात लिहिले गेले की,''नुपूर शर्माच्या विधानाप्रकरणी भारताने माफी न मागितल्यास. मी भारतात क्रिकेट खेळायला येणार नाही, तसंच मी आयपीएल स्पर्धेवर बहिष्कार टाकेन. मी माझ्या मुस्लिम बांधवांनाही असंच करण्याचं आवाहन करत आहे.'' 

'@Moeen_Ali18'  हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याचे आमच्या तपासात समोर आले. मे 2022 मध्ये हे अकाऊंट तयार करण्यात आले आणि 8000 अधिक फॉलोअर्स त्याला होते. अकाऊंटच्या बायोमध्ये नॉट ऑफिशियल असे लिहिले गेले हे.   

टॅग्स :IndiaभारतEnglandइंग्लंड