शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 20:04 IST

गेल्या काही दिवसापासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Claim Review : व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खर्गे सांगत आहेत की, काँग्रेस तुमचे पैसे मुस्लिमांमध्ये वाटून देईल.
Claimed By : Facebook And X Users
Fact Check : चूक

Created By: बूमTranslated By : ऑनलाइन लोकमत

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात दिग्गज नेत्यांच्या सभा सुरू आहेत. सध्या सोशल मीडियावर नेत्यांच्या भाषणाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत खरगे, काँग्रेस तुमचा पैसा मुस्लिम समाजाला वाटणार असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आली आहे.

 हा व्हायरल व्हिडीओ क्रॉप केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान मोदींवर काँग्रेसबद्दल खोटे बोलत असल्याचा आरोप करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खरगे म्हणत आहेत की, "काँग्रेसचे लोक काय करत आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? काँग्रेसच्या लोकांनी तुमच्या घरात घुसून कपाट फोडले, सर्व पैसे बाहेर काढले आणि मुस्लिमांसह बाहेरील सर्वांना वाटले. ज्यांची जास्त मुल आहेत त्यांना जास्त मिळणार, जर तुमच्याजवळ मुले नाहीत तर मी काय करू?, असंही खरगे बोलल्याचे दिसत आहे.व्हिडीओ शेअर करताना एका एक्स यूजरने लिहिले की, 'काँग्रेस बांधवांनो, ऐका तुमचे अध्यक्ष काय बोलत आहेत? खरंच हे घडणार आहे का?

(आर्काइव लिंक)

दाव्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी BOOM च्या टिपलाइन वर व्हिडीओ देखील प्राप्त झाला.

फॅक्ट चेक 

बूमने दाव्याची पडताळणी करण्यासाठी काँग्रेसचे यूट्यूब चॅनल शोधले. आम्हाला हा मूळ व्हिडीओ ३ मे २०२४ रोजी शेअर केलेला आढळला. मल्लिकार्जुन खरगे यांचा हा व्हिडीओ गुजरातमधील अहमदाबाद येथील जाहीर सभेत दिलेल्या भाषणाचा भाग आहे, जो खोटा दावा करून शेअर करण्यात आला आहे.

या व्हायरल व्हिडिओचा भाग मूळ व्हिडिओमध्ये ३२ मिनिटे २४ सेकंदात पाहता येतो. 

वास्तविक, खरगे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर काँग्रेसबद्दल खोटे बोलत असल्याचा आरोप करत होते.

३१ मिनिटे ५० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये खरगे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या 'न्याय' या मुद्द्यासह जात जनगणनेबद्दल बोलत आहेत.

"एक म्हणजे 'हिस्सेदारी न्याय', या शेअर न्यायामध्ये आम्ही सांगितले की जातीची जनगणना करायची आहे. कोणत्या समाजात किती लोक आहेत, किती पदवीधर आहेत, उत्पन्न किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे हे पाहण्यासाठी. "आम्ही जातिगणना करणार आहोत."

खरगे पुढे म्हणतात, "याबाबत मोदी साहेब जनतेला सांगतात की, काँग्रेसचे लोक काय करत आहेत, काँग्रेसचे लोक तुमच्या घरात घुसतात, कपाट फोडतात, सगळे पैसे बाहेर काढतात आणि बाहेरच्या सर्व लोकांमध्ये वाटून घेतात. ते मुस्लिमांमध्ये वाटतात, ज्यांना जास्त मुले असतील तर त्यांना जास्त मिळतील, तुमची मुल नसतील तर मी काय करु.'

व्हिडीओत खरगे पुढे सांगतात, आम्ही वाटणार नाही, कोणालाही असंच काढून देणार नाही. माफ करा मोदी साहेब हे पसरवत आहेत. असे विचार चुकीचे आहेत, समाजासाठी चुकीचे आहेत. देशासाठी चुकीचे आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी चुकीचे आहेत.

(सदर फॅक्ट चेक 'बूम' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे