शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

Fact Check: मुंबईत २१ मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, 'तो' व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:40 IST

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक इमारत कोसळताना दिसत आहे आणि ही घटना मुंबईत घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

Claim Review : मुंबईत २१ मजली इमारत कोसळली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Claimed By : facebook user
Fact Check : चूक

Created By: विश्वास न्यूज 

Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक इमारत कोसळताना दिसत आहे आणि ही घटना मुंबईत घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईत २१ मजली इमारत कोसळली असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

विश्वास न्यूजने केलेल्या पडताळणीमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित व्हिडिओ डिजिटल पद्धतीचा वापर करुन तयार करण्यात आला आहे आणि तो खरा असल्याचं समजून युझर्स फसव्या दाव्यासह शेअर करत आहेत. 

व्हायरल पोस्टमध्ये काय?फेसबुक यूझर Sanwrmal Godara याने हा व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर केला आहे. त्यात त्याने, “मुंबईत कोसळली 21 मजली इमारत", असे लिहिले आहे. 

mahesh.shakya.9822924 नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरनेही याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

तपासव्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डसह शोध घेतला. आम्हाला या दाव्याशी संबंधित कोणतीही विश्वसनीय बातमी सापडली नाही. मुंबईत अशी घटना घडली असती, तर त्यासंदर्भातील बातम्या नक्कीच चर्चेत असत्या. 

व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला असता व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत खरी दिसत नाही. जेव्हा इमारत कोसळते तेव्हा धूर दिसत नाही किंवा कोणताही स्फोट होत नाही, ज्यामुळे हा व्हिडिओ खोटा असल्याचा संशय बळावतो. व्हिडिओचे स्क्रीन ग्रॅब घेतले आणि गुगल लेन्सने त्यांचा शोध घेतला. BrickBreak नावाच्या पर्ल या युट्यूब चॅनलवर व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखेच व्हिडिओ आम्हाला सापडले. त्यात व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इमारतीसारखे अनेक व्हिडिओ दिसतात. चॅनलवर उपलब्ध माहितीनुसार, हे सर्व व्हिडिओ बनवण्यात आले आहेत.  

आम्हाला TDC च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओसारखेच अनेक व्हिडिओ आढळले.

 

व्हिडिओ Funny Story नावाच्या फेसबुक पेज वर आम्हाला हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 7 डिसेंबर 2024 रोजी अपलोड करण्यात आला आहे. फेसबुक पेजच्या बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे पेज गेमिंग व्हिडिओ बनवते. 

व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी आम्ही व्हिडिओ तज्ज्ञ अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ कॉम्प्युटरची मदत घेऊन तयार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. हे एका इमारतीचे मॉडेल आहे. वास्तव नाही. संबंधित इमारत बनावट आहे, असे त्यांनी सांगितले.

शेवटी आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूझरचे प्रोफाइल स्कॅन केले. फेसबुकवर या यूझरला 8 हजार लोक फॉलो करत असल्याचे समोर आले आहे. त्याने राजस्थानला वास्तव्याला असल्याचे नमूद केले आहे. याआधीही अनेक डिजीटल पद्धतीने तयार केलेले व्हिडिओ खरे समजून शेअर करण्यात आले आहेत. विश्वास न्यूजच्या वेबसाईटवर त्यांचा फॅक्ट चेक रिपोर्ट वाचता येईल.

निष्कर्ष : मुंबईत 21 मजली इमारत कोसळल्याच्या दाव्यासह व्हायरल झालेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ डिजीटल पद्धतीने तयार करण्यात आला असून, तो खरा मानून लोक खोट्या दाव्यासह त्याला शेअर करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

(सदर फॅक्ट चेक 'विश्वास न्यूज' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाSocial Viralसोशल व्हायरलMumbaiमुंबई