शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं; अभिनेता सयाजी शिंदेंचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी हटके उपक्रम  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 1:17 PM

वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व झाडे, स्थानिक पंचायतीने किंवा संस्थांनी आणून लावायची आहेत. 

मुंबई – सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई आणि सरपंच परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र दिन हटके स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं हा अभिनव उपक्रम राज्यभरात राबवणार येणार आहे. झाडं आणि निसर्ग यांच्याबद्दल सयाजी शिंदेंना असलेली संवेदनशीलता आणि आत्मीयता सर्वांनाच ज्ञात आहे. 

राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावात लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे. आणि या उपक्रमास महाराष्ट्र भरातून  उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच परिषदे व्यतिरिक्त स्थानिक लोकं आणि स्थानिक सामाजिक संस्था ही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत. राष्ट्रांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी राज्यभरात २८,८१३ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतिच्या अखत्यारीत असलेल्या गावांत लोकसहभागातून प्रत्येकी १०० स्वदेशी वाणाच्या झाडांचे रोपण व संगोपन करत एका नव्या अर्थाने राष्ट्रध्वजास सलामी द्यायचा मानस करायचा आहे असं सयाजी शिंदेंनी म्हटलं. 

काय आहे या अभियानाचे स्वरूप ◆ १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान , कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त आपल्या क्षमतेनुसार वृक्षांची लागवड करावी. वृक्ष लावताना देशी आणि स्थानीक प्रजातीची असावीत.◆वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व झाडे, स्थानिक पंचायतीने किंवा संस्थांनी आणून लावायची आहेत. ◆ सदर वृक्षारोपन हे गावातील जेष्ठ मंडळी यांच्या देखरेखीखाली, गावातील तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे,शालेय विद्यार्थी यांच्या सहभागातून करून घेणे अपेक्षितआहे.◆ ग्रामपंचायतीने शंभर झाडांची लागवड व जोपासना करण्याचा ठराव आणि सरपंच ग्रामसेवक यांचे सहभागी होत असल्याचे पत्र सहयाद्री देवराईच्या ई-मेलवर पाठवावे.◆आंबा,जांभूळ ,फणस,सीताफळ,बोर,चिकू ,पेरु हयासारखी  विविध झाडे विविध संकरित वाणात उपलब्ध आहेत. उपजीविकेसाठी आणि गावाच्या आर्थिक उत्थानासाठी अधिक वाण देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाऊ शकते. ◆ आपल्या वृक्षांची जोपासना पाहून सह्याद्री देवराई, यांचेकडून आपल्या गावाला सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल.◆ जी गावे पाचशे वृक्ष किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष जोपासतील, त्यांना सह्याद्री देवराई च्यावतीने "विशेष गौरव" देऊन सन्मानित करण्यात येईल.◆ उपक्रम राबविण्यास सहयाद्री देवराई कडून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र   विभाग पातळी वर समनव्ययक नेमले असून त्यांच्या मार्फत विभागातील सरपंच व स्थानिक लोकांना  मार्गदर्शन केले जाते. 

विभाग निहाय सहयाद्री देवराई यांचे समन्वयक संपर्क:अमरावती विभाग समाधान लभडे (मो. ९९२०१०९७९९)कोकण विभाग तुषार देसाई (मो. ९१३७४२००२९)नाशिक विभाग निशांत भारद्वाज (मो. ९७०२४९०३८३)औरंगाबाद विभाग योगेश पंदेरे (मो. ८७६७५५८९९५) नागपुर विभाग रतिश रानवडे (मो. ९०२९००२२२३) पुणे विभाग सचिन ठाकूर (मो. ९३७३४२००१८)

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदे