शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गर्भातील बाळाच्या फुप्फुस, मेंदूत मिळाले प्रदूषणाचे विषारी कण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:00 IST

नवीन अभ्यासातून खुलासा; आईच्या श्वासातून बाळापर्यंत पोहोचतोय धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वायू प्रदूषणाने जगभर अक्राळविक्राळ रूप धारण केले असून, आता गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्येच न जन्मलेल्या बाळाच्या फुप्फुस, यकृत आणि मेंदूमध्ये वायू प्रदूषणाचे विषारी कण पाहायला मिळाले आहेत. स्कॉटलंडचे एबरडीन विद्यापीठ आणि बेल्जियमच्या हेसल्ट विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अभ्यासात समोर आलेले निष्कर्ष चिंताजनक आणि काळजीत अधिक भर घालणारे असून, भ्रूण विकासासाठी हे महिने अतिशय महत्त्वपूर्ण असतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हे संशोधन स्कॉटलंड आणि बेल्जियममध्ये धूम्रपान न करणाऱ्या ६० आई आणि गर्भातील भ्रूणांवर करण्यात आले. वैज्ञानिकांनी ३६ भ्रूणांच्या ऊतींच्या नमुन्यांचेही विश्लेषण केले, ज्यांचा ७ ते २० आठवड्यांमध्ये गर्भपात झाला होता. अभ्यासानुसार, आईच्या श्वासाद्वारे प्रदूषित कण नाळेद्वारे (प्लेसेंटा) भ्रूणापर्यंत पोहोचतात. याप्रकारच्या ऊतींमध्ये हजारो कार्बन कण आढळले आहेत. हे कण वाहन, कारखाने आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड वापरल्याने तयार झालेल्या धुरामुळे तयार होतात. यामुळे शरीराला नुकसान होते.

आयुष्यभर होऊ शकतो परिणामगर्भपात, वेळेआधी बाळाला जन्म, जन्मावेळी कमी वजन व डोक्याच्या विकासात गडबड होण्याला प्रदूषित हवेला कारणीभूत ठरवले जाते. नवीन संशोधन सांगते की, कार्बनचे सूक्ष्म कण पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये प्लेसेंटामध्ये प्रवेश करतात, असे नाही तर ते विकसनशील असलेल्या भ्रूणाच्या अंगातही आपला मार्ग तयार करतात. हे कण विकसनशील मानवाच्या मेंदूमध्येही प्रवेश करतात, ज्याचे परिणाम आयुष्यभर दिसून येतात.

यापूर्वीही झाले आहे संशोधनलंडनच्या क्विन मेरी विद्यापीठात प्रथम २०१८मध्ये प्लेसेंटामध्ये वायू प्रदूषणातील कण सापडले होते. मात्र आता प्रदूषणाचे कण भ्रूणापर्यंत पोहोचल्याचे संशोधन समोर आले आहे. जगातील ९९ टक्के लोकसंख्या अशा जागेवर राहते जिथे वायू प्रदूषणाचा स्तर निर्देशांपेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषण