शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकेसाठी औषधी वनस्पतींच्या बिया करणार जमा, निसर्गमित्रचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:47 IST

environment Tree Nursury Kolhapur : सद्य:स्थितीत एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे योग्य नसल्यामुळे, वैयक्तिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी विविध वृक्ष, औषधी वनस्पती, फळझाडे यांच्या बिया जमा करून त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवून त्यापासून रोपे तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे निसर्गमित्र परिवार या संंस्थेने औषधी वनस्पतींच्या बिया जमा करून रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देरोपवाटिकेसाठी औषधी वनस्पतींच्या बिया करणार जमा, निसर्गमित्रचा उपक्रम कोल्हापूर परिसरात हजारो वनौषधींचा खजिना, जतन करण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज

संदीप आडनाईक

कोल्हापूर : सद्य:स्थितीत एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे योग्य नसल्यामुळे, वैयक्तिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी विविध वृक्ष, औषधी वनस्पती, फळझाडे यांच्या बिया जमा करून त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवून त्यापासून रोपे तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे निसर्गमित्र परिवार या संंस्थेने औषधी वनस्पतींच्या बिया जमा करून रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.कोल्हापूरवर निसर्गसंपदेचा वरदहस्त आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आयुर्वेद उपचारात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या, दुर्मीळ वनौषधीदेखील जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. या वनौषधी भविष्यकाळासाठी सांभाळून ठेवणे गरजेचे असल्याने या वनस्पतींच्या बियांचे संकलन आणि रोपनिर्मिती करून त्यांच्या प्रचार- प्रसार करणे यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.हे ओळखून निसर्गमित्र संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने बिया संकलनाचा उपक्रम राबवत आहे. अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी, असंख्य दुर्मीळ वनस्पतींच्या बियांचे संकलन करून संस्थेकडे सुपुर्द केले असून, संस्थेने त्या बियांपासून रोपवाटिकेची निर्मितीदेखील केली आहे. यंदा हे वर्ष फळे व पालेभाज्या संवर्धन वर्ष असून, हे वर्ष सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन घरच्या घरी साजरे करावे, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.आपल्या परिसरात आढळतात या वनौषधीगुळवेल, गोकर्ण, गुंज, करांदा, मायाळू, घोसाळे, बाजीराव घेवडा, तोरण, रताळे, रान घेवडा, रान मिरवेल, कोहळा, काळीमिरी, फॅशन फ्रुट, वाघाटी, तोंदली, गवती चहा, अडुळसा, हादगा, म्हाळुंग, अश्वगंधा, ओवा, राजिगरा, बंपर (पपनस), सुरण, लिंबू, कढीपत्ता, शेंद्री, निर्गुडी, मेंदी, बंदुकीचा पाला, गोंदणी, अशा अनेक वनौषधी आपल्या परिसरात उपलब्ध आहेत.

आपल्या परिसरात, अवतीभोवती सहजपणे मिळणाऱ्या अनेक फळे, फुले, कंदमुळे, झुडपे, वृक्ष-वेली, अशा विविध वनस्पती व वनौषधींच्या बिया गोळा करून त्यांची रोपवाटिका तयार करण्याचे काम प्रत्येकाने यथाशक्ती करावे, असे आवाहन निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी केले आहे. बियांचे संकलन करून निसर्गप्रेमी नागरिकांनी घरच्या घरी आपल्या बागेत, परिसरामध्ये वनौषधींची लागवड करावी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवून त्यापासून रोपनिर्मिती करावी; अथवा या वनौषधींच्या बियांचे संकलन करून निसगप्रेमी संस्थेकडे देण्याचाही पर्याय आहे.-अनिल चौगुले,कार्यवाह, निसर्गमित्र संस्था, कोल्हापूर

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर